मुंबई -अहमदाबाद महामार्ग 48 ठरला मृत्यूचा सापळा
पालघर - 8 सप्टेंबर 2022 रोजी कुणबी युवा सेनेकडून मृत्यूचा सापळा बनलेल्या महामार्ग क्रमांक 48 वरील सुरक्षा व बेकायदेशीर रस्ते कर ( टोल ) आकारणी बंद करण्या संदर्भात जिल्हाधिकारी पालघर यांना निवेदन दिले.
*मुंबई -अहमदाबाद* राष्ट्रीय महामार्ग क्रमांक *48* वर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे तसेच अपघाती क्षेत्रात सूचना फलक न लावल्याने शेकडो लोकांचे बळी जाऊन,मोठमोठे अपघात होऊन वाहनांचे मोठे आर्थिक नुकसानही झाले असून,अजून होत आहे. या महामार्गावरून अनेक नोकरदार,कष्टकरी, शेतकरी,शाळकरी मुले- मुली प्रवास करीत असतात. या महामार्गाच्या कामावर संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे अपरिमित प्राणहानी होत आहे. रस्ते कर आकारणी (टोल नाका ) वाढीव मुदत संपूनही बेकायदेशीरपणे 100% टोल वसुली सुरू आहे. ह्या संदर्भात येथील लोकप्रतिनिधींनी आंदोलन करून ही रस्ते दुरुस्तीच्या नावाने तोंडाला पाणी पुसणारे काम प्रशासना कडून करणे सुरू असल्याचे येथील जनतेचे म्हणणे आहे. या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेले दिनांक -30 ऑगस्ट रोजी *कुमारी प्रिया रवींद्र पवार* वय पंचवीस वर्ष ( रा.हालोली,पालघर ) ही तरुणीवरही नका येथील पुलावधी कळला चुकत असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. असे शेकडो निरपराध लोकांचे बळी गेले आहेत. मात्र गेल्या आठवड्यात टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती *सायरस मिस्त्री* यांच्या अपघातामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. म्हणजेच मोठ्या व्यक्तीचा बळी गेल्यावरच प्रशासन दखल घेणार आहे की काय? अशी स्थानिकामध्ये संताप जनक चर्चा चालू असल्याचे निदर्शनास येते. कुणबी युवा सेने तर्फे 8 दिवसांमध्ये मुंबई -अहमदाबाद मार्गावरील *पडलेले खड्डे व अपघाती क्षेत्रावर* सूचना फलक: लावणे ह्या गोष्टीचे समाधानकारक निरसन व्हावे तसेच त्याबाबत लेखी कळवावे.अन्यथा कुठल्याही प्रकारे पूर्व सूचना न देता कुणबी सेनेच्या माध्यमातून कुणबी सेना प्रमुख सन्माननीय *श्री.विश्वनाथ पाटील* साहेब , आणि पालघर कुणबी सेना जिल्हाप्रमुख सन्माननीय *श्री. ** अविनाश पाटील* यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग 48 रोखून तीव्र आंदोलन करण्यात येईल. आंदोलकांकडून कोणत्याही प्रकारचा कायदा, प्रशासन व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्यास शासन जबाबदार राहील. तसेच वरील विषयाची योग्य ती दखल घेऊन होणाऱ्या त्रासापासून नागरिकांची मुक्तता करण्यात यावी असे पत्र जिल्हाधिकारी पालघर यांना देण्यात आले असल्याची माहिती कुणबी सेना युवा दल प्रमुख श्री प्रशांत सातवी यांनी दिली. ह्या प्रसंगी युवा सेना दलाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रीतम पाटील,अमेय पाटील, राजू पाटील,दीपेश पाटील,भावेश घरत,योगेश पाटील,जयेश पाटील,धीरज पाटील,विपुल सातवी,प्रकाश शेलार,गणेश नाईक, गौरांग पाटील, गौरव कंडी,पंढरी पाटील, मंथन पाटील, हार्दिक पाटील उपस्थित होते.
Post Views: 512