आज सकाळी वाशिम जिल्ह्यातील विळेगाव येथील वाहुन गेलेल्या इसमाचा दिवसभर घेतला शोध
उद्या सकाळी राबविणार शोध मोहीम त्रीव, ......
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
13 Jul 2023, 2:28 PM
पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक, शाखा मंगरूळपीर च्या जवानांनी आज घटनास्थळा पासुन ते उंद्री धरणापर्यंत व धरणातही दिवसभर घेतला शोध.
विळेगाव ता.कारंजा जि.वाशिम येथील ज्ञानेश्वर सुभाष राठोड वय अंदाजे (40) वर्ष हे विळेगाव जामठी नाल्या वरील पुला जवळ मित्रासह आज सकाळी सहा वाजता आले होते यावेळी येथील पुल अचानक खचला आणी सुभाष राठोड हे पाण्यात पडुन वाहुन जायला लागले यावेळी सुभाष राठोड यांचा मित्र कसाबसा वर आला आणी सुभाष राठोड यांचा हात पकडून वर घ्यायला लागला परंतु पुर मोठा होता आणी पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सुभाष चा हात सटकला आणी सुभाष राठोड हे पुलाच्या पाईप मधुन पुढे वाहुन गेले लगेचच यावेळी गावक-यांनी शोधाशोध केली परंतु काही मिळुन आले नाही.शेवटी कारंजा तहसीलदार कुणाल झाल्टे सरांनी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत साहेब यांनी व पोलीस स्टेशन धनज यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले लगेचच क्षणाचाही विलंब न करता दिपक सदाफळे यांनी आपले मंगरूळपीर शाखेचे सहकारी,अतुल उमाळे, गोपाल जैस्वाल, गोपाल गिरे,अपूर्व चेके,लखन खोडे,अजय डाके,दत्ता माणेकर,सुमित मुंढरे , महादेव मांगडे यांना घटनास्थळी शोध व बचाव साहीत्यासह रवाना केले.तात्काळ सकाळी तहसीलदार कुणाल झाल्टे सर यांच्या आदेशाने व धनज पो.स्टे.चे पिआय योगेश इंगळे साहेब यांच्या आदेशाने व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत साहेब यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळा पासुन सर्च ऑपरेशन चालु केले. घटनास्थळी पासुन ते उंद्री धरणापर्यंत व उंद्री धरणातही सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत शोध घेतला परंतु काही मिळुन आले नाही. यामुळे सुभाष राठोड हे धरणात वाहुन गेल्याची दाट शक्यता आहे.आता उद्या सकाळी पुन्हा रेस्क्यु बोटद्वारे सर्च ऑपरेशन त्रीव राबविण्यात येईल अशी माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांनी दीली आहे
Post Views: 72