ना.बच्चू कडू यांना मातृशोक


इंदिराबाई कडू यांचे दीर्घ आजाराने निधन
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  12 Mar 2022, 7:44 PM
   

अकोल- जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिक्षण,कामगार आणि जलसंपदा राज्यमंत्री ना.बच्चू कडू यांची आई श्रीमती इंदिराबाई बाबाराव कडु यांचे आज दुपारी साडे बाराच्या दरम्यान वयाच्या ८४व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर बेलोरा ता. चांदुर बाजार जि. अमरावती येथे रविवार 13 मार्च रोजी सकाळी १० वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. ना.बच्चू कडू यांनी लोकसेवेचा वसा ज्यांच्या कडून स्वीकारला आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनातील असंख्य संकटात त्या इंदिराबाई यांच्या मागे 5 मुले,4 मुली ,नातवंडे आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.

    Post Views:  229


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व