भेदभावविरहीत लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ देशभरात नावलौकिक मिळवेल : जेष्ठ पत्रकार मधूभाऊ जाधव
लोकस्वातंत्र्यचा विचारमंथन व शालेय साहित्त्य वितरण कार्यक्रम संपन्न
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
12 Apr 2022, 12:42 PM
अकोला- पसंतीला उतरणारे वैशिष्ट्यपूर्ण लोकस्वातंत्र्य हे नाव,भेदभावपलिकडे जाऊन मानवतावाद शिकविणाऱ्या संत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांच्या वंदनाने कार्याची सुरूवात, आणि त्यांच्या साक्षीने पत्रकार कल्याण आणि समाभिमूख उपक्रमांसह होणाऱ्या आदर्श वाटचालीने लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ निश्चितच संपूर्ण भारतात नावलौकिक प्राप्त करेल असे मनोगत जेष्ठ पत्रकार व रंगकर्मी श्री मधूभाऊ जाधव यांनी व्यक्त केले.
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचा आठवा विचारमंथन मेळावा व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्त्याच्या वाटपाचा कार्यक्रम अकोल्यात जठारपेठेतील जैन रेस्ट्रोमध्ये पार पडला.त्यावेळी ते अध्यक्षिय भाषणातून ते बोलत होते.यावेळी सामाजिक कार्यकर्ते व नेहरू पार्कचे संचालक श्री.बि.एस.देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून तर पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा.राजाभाऊ देशमुख,पत्रकार महासंघाचे केन्द्रीय सचिव राजेन्द्र देशमुख, कोषाध्यक्ष कीशोर मानकर,विदर्भ संघटक व अ.भा.ग्राहक परिषदेचे वर्धा जिल्हा संघटक किशोर मुटे हे व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराजांना वंदन करून शिक्षणमहर्षी स्व.भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना अभिवादन करण्यात आले.त्याचप्रमाणे शासनाकडून अकोला येथे उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक भवनाला नाट्य,साहित्त्य, कला क्रिडा,साहित्त्य,सांस्कृतिक,सामाजिक,शैक्षणिक,राजकीय आणि ईतर विविध क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाने अजरामर ठरलेले अकोल्याचे माजी नगराध्यक्ष,प्राचार्य स्व.डॕडी देशमुखांचे नाव देण्यात यांवे ही महत्वपूर्ण चर्चा या विचारमंथन मेळाव्यात झाली.त्याला विद्यार्थांसह सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडात अनुमोदन दिले.संघटनेच्या ठरावासह याबाबतची पत्रे मा.मुख्यमंत्री,सांस्कृतिक मंत्री व अकोला जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना देण्यात येतील असे यावेळी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांनी जाहिर केले.
याप्रसंगी विनामुल्या शिकवणी वर्ग घेणाऱ्या बॉबी जाधव यांच्या पंचशील नगरच्या वर्गातील सतरा विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार लॉगबुक व पेनांचे वाटप करण्यात आले.अतिथींच्या स्वागतासोबतच त्यांचेही निरपेक्ष शैक्षणिक सेवेबध्दल सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबध्दल सर्वश्री मधुभाऊ जाधव,बि.एस.देशमुख,किशोर मुटे यांना अभिनंदन तथा सन्मानपत्राने, तर कायदेविषयक कार्यशाळेतील सहभागाबाबत सर्वश्री.अॕड राजेश जाधव,अॕड.राजेश कराळे,अॕड.प्रविण तायडे यांना आभारपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.त्याचप्रमाणे जागतिक ग्राहकदिनाच्या कार्यक्रमाला वर्धा येथे जाऊ न शकल्याने संजय देशमुख,अॕड.नितीन अग्रवाल व अॕड. राजेश जाधव यांना अ.भा.ग्राहक परिषदेचे वर्धा जिल्हा संघटक किशोर मुटे यांनी ग्राहकमित्र पुरस्कार म्हणून स्मृतिचिन्ह,शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले.शासकीय कामकाजात कोणत्या कामकाजातील विलंबास प्रतिबंध करणारी अधिनियम २००५ कलम ०८ प्रमाणे असणारी नागरीकांच्या सनदीचे पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्याना मार्गदर्शनार्थ वाटप करण्यात आले. आपल्या संचलनपर संवादातूनच संजय देशमुख यांनी महसंघाचे संघटनकार्य,व उपक्रमांबाबत माहिती देऊन सहकार्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे केन्द्रीय उपाध्यक्ष प्रदिप खाडे, मार्गदर्शक, साहित्य संस्कृती मंडळ सदस्य पुष्पराज गावंडे, संघटनप्रमुख सिध्देश्वर देशमुख, डॉ.शंकरराव सांगळे, अंबादास तल्हार, संदिप देशमुख, एड. राजेश कराळे,अॕएड. सौरभ गुप्ता, एस पी.ठाकरे, रविबाप्पू देशमुख, आनंद इंगळे,जिल्हाध्यक्ष विवेक मेतकर, उपाध्यक्ष मोहन शेळके, सागर लोडम, राहूल राऊत, मंगेश चऱ्हाटे, सौ.दिपाली बाहेकर, सतिश देशमुख व विद्यार्थी उपस्थित होते. आभारप्रदर्शन प्रदिप खाडे यांनी केले
Post Views: 171