नांदुऱ्यातील जंगली महाराज कनिष्ठ महाविद्यायात वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  02 Mar 2022, 10:01 PM
   

नांदुरा : श्री महादेव गौरक्षण संस्थान द्वारा संचालित श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कुल अँड जुनिअर कॉलेज नांदुरा येथे वार्षिक सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
     महामारीच्या संकटामुळे शाळांमधील वार्षिक दिवस देखील साजरे होत नव्हते.शाळा व्यवस्थापनांनी एकजुटीची भावना जागृत करण्यासाठी आणि कठीण प्रसंग असूनही विद्यार्थ्यांना त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
        वार्षिक दिवसांचे कार्यक्रम आयोजित करण्याचा हेतू या निष्कर्षावर आधारित आहे की, महामारीच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी अनुभवलेल्या शैक्षणिक दबाव आणि मानसिक चिंतांवर मात करण्यासाठी एक साधन म्हणून अभ्यासेतर उपक्रम आयोजित करण्यासाठी प्रयत्न केले.
मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यासाठी व शैक्षणिक ताण कमी करण्यासाठी आणि मुख्य प्रवाहातील शिक्षणामध्ये सह-अभ्यासक्रम क्रियाकलाप समाविष्ट करण्यासाठी वार्षिक सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
           या वेळेस कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय आमदार श्री राजेशजी पंडितरावजी एकडे सर,श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कुल अँड जुनिअर कॉलेज चे प्राचार्य श्री विश्वास मापारी सर,श्री उमेश सुरळकर सर,श्री रवि ठाकुर सर, श्री संतोष ठाकुर सर, श्री प्रविण गिरी सर,श्री विलास धोरण सर,श्री शैलेश ठाकुर सर, श्री श्याम क्षिरसागर सर,श्री नितिन ढोले सर,कविता मानकर मॅडम,अर्चना साठे मॅडम,अनिता इंगळे मॅडम,कल्पना खोद्रे मॅडम,निकिता पांडव मॅडम,धनश्री मलिक मॅडम,सुलभा राऊत मॅडम, वनिता वडोदे मॅडम,निकिता माहुरे मॅडम,राधिका उधानी मॅडम,शीतल हिवरखडे मॅडम, वेरुळकर मॅडम,गावंडे मॅडम उपस्थित होते....कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विश्वास मापारी सर यांनी केले.मुख्य अतिथी माननीय आमदार श्री राजेशजी पंडितरावजी एकडे सर यांनी रात्र शाळा,ग्रंथालय,विज्ञान प्रदर्शनीचे उद्धघाटन केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन दिशा अमलकर मॅडम आणि प्रगती डंबेलकर मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन ममता बावस्कर मॅडम यांनी केले.

    Post Views:  682


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व