अकोला : बाबुजी देशमुख वाचनालयाद्वारे मंगळवार दि. ७ फेब्रुवारी रोजी आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत प्रभात किड्स स्कूलच्या इयत्ता आठवीतील देहुती बगळे हिने प्रथम क्रमांक पटकाविला असून शाळेसाठी फिरता चषक देखील पटकाविला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये भाषण कौशल्याचा विकास व्हावा व तसेच त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या हेतूने आयोजित या वक्तृत्व स्पर्धेचा विषय भगवान महावीर: जीवन आणि कार्य होता. या स्पर्धेत देहुती हिने भगवान महावीर यांच्या जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या शांती, अहिंसेच्या संदेशावर सुंदर विवेचन केले. या वेळी बाबुजी देशमुख वाचनालयाचे अध्यक्ष महादेवराव भुईभार, प्रा. मोहन खडसे, प्रा. बबन कानकिरड प्रामुख्याने उपस्थित होते. देहुतीला तिचे वडील प्रमोद बगळे व प्रभातचे सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रभातच्या प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, शाळा समन्वयक मो. असिफ यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी देहुतीचे कौतुक केले आहे.
Post Views: 175
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay