रोजगाराचे फसवणूक फंडे, युवकांना लाखोंचे गंडे!


सायबर जनजागृती भाग 3; रोजगाराच्या नावावर बाजारपेठत स्क्रीम; तरुणांना अलगद हेरले जातेय
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  19 Apr 2022, 9:31 PM
   

अकोला: दिवसेंदिवस वाढती बेरोजगारी, आर्थिक टंचाईमुळे रोजगाराचे नवनवीन फंडे मार्केटमध्ये उदयास येत असून या माध्यमातून युवकांना बनवण्याचे प्रकार समोर येत आहे. झटपट नोकरी, पैशाचे आमिष, व सर्व काही तात्काळ मिळवण्याची आशा त्यातून फसवणुकीचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले जात असून तरुणांना त्यामध्ये अलगद हेरले जात असल्याचे चित्र आहे.
गेल्या अलीकडच्या काही वर्षांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढल्याने तरुणाई चिंताग्रस्त झाली आहे. कोणत्याही माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविला जावा याच आर्थिक विवंचनेत ताणतणाव, चिंता वाढीस लागले आहेत. तरुणाईच्या बेरोजगारीचे व आर्थिक विवंचनेला हेरून रोजगाराच्या नावाखाली बाजारपेठेमध्ये अलीकडच्या काळात अनेक नवनवीन फंडे येत आहे. युवकांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी वेगवेगळ्या रोजगार देण्याच्या स्कीम तरुणाईच्या पुढ्यात दररोज ठेवल्या जात आहे. बेरोजगारीचे वाढत्या प्रमाणाला केंद्रस्थानी ठेवून तरुणाईला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी पद्धतशीरपणे जाळे विणले जात आहे. आपल्याला रोजगार मिळतो म्हणून तरुण सुद्धा वाहवत जात असून बाजारातील रोजगाराच्या या फंडांना बळी पडत आहे. झटपट मिळणाऱ्या जॉब, रोजगार, पैशाचे आमिष, साखळी पद्धतीचे रोजगार हे सर्व फसवणूककीचे प्रकार असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे. मात्र तरीसुद्धा अनेक युवक अशा रोजगार फड्यांना बळी पडत असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.
फसवणुकीचे प्रकार उजेडात
महिलांना रोजगार देण्याच्या नावावर फसवणुकीचा प्रकार नुकताच घडला असताना तरुणांना रोजगार देण्याच्या नावाखाली पैसे मागून त्यांची फसवणूक केल्याचा आणखी प्रकार अकोल्यात उजेडात आला आहे. डुंजो कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयसह इतर पदांवर नोकरी देण्याचे आमिष दाखवून शेकडो युवक-युवतींकडून पैसे घेऊन फसवणूक केली आहे.

    Post Views:  184


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

आई

४२ मिनेट