मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ताफा जातानाचा मुंबईतील एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालाआहे. हा ताफा जाताना एक रुग्णवाहिकाही पोलिसांनी अडवली होती, असं व्हिडीओमध्ये दिसतंय. यावरुन सोशल मीडियात चर्चांना उधाण आलं होतं. अखेर पोलिसांनीही या व्हायरल व्हिडीओवर आपलं म्हणणं मांडलं आहे. नेमकं पोलीस काय म्हणाले आणि हा एकूणच सगळा प्रकार काय होता, हे सविस्तर जाणून घेऊयात.
वरील व्हिडीओ ट्वीटरवर अपलोड करत अनेकांनी मुंबई वाहतूक पोलिसांवर टीका केली होती. रुग्णवाहिकेला थांबवून मंत्र्यांचा ताफा का जाऊ दिला गेला, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. अखेर या सगळ्या मुंबई वाहतूक पोलिसांचं काय म्हणणंय, तेही समोर आलं आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सदर व्हिडीओ हा अंधेरी पूर्वेच्या मरोळ येथील आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांचा ताफा जाणार असल्याकारणाने या ठिकाणची वाहतूक रोखण्यात आली होती. याचवेळी एक रुग्णवाहिकाही त्याठिकाणी होती. पण महत्त्वाची बाब म्हणजे या रुग्णवाहिकेत कुणीही रुग्ण नव्हता, असंही पोलिसांनी म्हटलंय. तांत्रिक बिघाडामुळे रुग्णवाहिकेचा सायरस बंद होत नव्हता. त्यामुळे रुग्णवाहिकेचा सायरस सुरुच असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून आलंय. याबाबत रुग्णवाहिका चालकाचाही जबाबब लवकरच नोंदवून घेतला जाईल, असंही पोलिसांनी म्हटलंय.
Post Views: 271
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay