सरेवाडीत पोषण आहार शिजविणे अभिमानास्पद


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  25 Feb 2022, 12:39 PM
   

आज गुरुवार दिनांक 24 फेब्रुवारी 2022रोजी जि प प्राथमिक शाळा सरेवाडी (नायफड) अतिदुर्गम व  भीमाशंकर च्या पायथ्याशी असणारी प्राथमिक शाळा येथे शालेय व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून शाळेपासून दोन ते अडीच किलोमीटर राहणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता शालेय पोषण आहार पालक व ग्रामस्थांच्या मदतीने शिजून दिला जातो. शाळेत कोणत्याही प्रकारचा तांदूळ शिल्लक नसताना. कोणत्याही स्वरूपाचे अनुदान देय  नसताना, विद्यार्थ्यांचे होणारे शारिरीक नुकसान म्हणून पालकांनी स्वतःचे चांगल्या दर्जाचे तांदूळ देऊन भात शिजवून घेण्याचा निर्णय घेतला. मुंबई माता बाल संगोपन केंद्राच्या मार्गदर्शिका मा. सौ.स्वातीजी शिंदे मॅडम व केंद्राचे मामा श्री.अशोकजी मांजरे मामा यांचा सत्कार करताना युवा कार्यकर्ते मा.शरदजी ठोकळ व मा.रोहनजी ठोकळ सन्माननीय पाहुण्यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. मॅडम यांनी व मांजरे मामांनी शालेय पोषण आहार हा बंद असतानाही शाळेत शिजून दिला जातो याचे कौतुक केले व इंद्रायणी तांदळाची शिजवुन चव फार रुचकर आहे, असेही म्हटले. विद्यार्थ्यांशी सौ. शिंदे मॅडम यांनी हितगुज केले. 
प्रती सप्ताह सोमवार शालेय विद्यार्थ्यांना पोषक आहाराचे वाटप माता बाल संगोपन केंद्रातून शेंगदाणा बर्फी, केळी व बिस्कीटांचे वाटप केले जाते यापूर्वी संस्थेने आमच्या शाळेला ई- लर्निंग कीट, टीव्ही व लैखन साहित्याचे वाटप केलेले आहे. सूत्रसंचालन व आभार श्री. विजयकुमार शेटे व शाळेचे मुख्याध्यापक मार्गदर्शन श्री.बापूराव दराडे यांनी केले. खेड तालुक्याचे उपक्रमशील गटशिक्षणाधिकारी श्री.संजयजी नाईकडे: अनुदान नसताना अतिदुर्गम भागातील शालेय व्यवस्थापन समिती व पालक यांनी घेतलेला निर्णय अभिमानास्पद आहे. डेहणे बीटचे विस्ताराधिकारी श्री.जीवनजी कोकणे, नायफड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.भरतजी लोखंडे यांनी या उपक्रमाबद्ल अभिनंदन केले आहे.

    Post Views:  442


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व