बांधकाम करून जागेच्या मालकाला ठार मारण्याचा कट


राजेश चौहान यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  29 Dec 2022, 11:59 AM
   

पालघर -(संतोष घरत )-पालघर जिल्यातील बोईसर येथील यादव नगर भागात श्रीमती.नगेसरी समलदार चौहान सं.नं.७२ ड नवीन सर्वे नं.५१ / २ /ड १९९७ ला खरेदी केली असून ते आज पर्यंत त्या जागेची रीतसर ग्रामपंचायतीचा कर भरत असून बोईसर येथील भूमाफिया प्रशांत संखे, मिलिंद संखे, आणि चंदन सिंग यांनी जबरदस्तीने हडप करत तुकडा बंदी कायद्याच्या गैर उपयोग करत महसूल विभागाचे काही लाचखोर अधिकारी यांच्या सहकार्याने 7/12 वर श्रीमती नगेसरी समलदार चौहान यांचे नाव कमी करत ११ गुंठे जमीन हडप करीत त्या जागेवर बांधकाम करून जागेच्या मालकाला जिवे ठार मारण्याचा कट केला जात असल्याबद्दल राजेश चौहान यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी या भू माफियांनी भवानी चौक येथील सरकारी भूखंड हडप करीत त्यावर रातोरात शेड उभे करण्याचा प्रकार केला होता. याबाबत आज पर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई ही झाली नसल्याचे देखील समोर आले आहे.मिळालेल्या माहिती नुसार हे भू माफिया महसूल विभागातून माहिती काढत बोईसर येथील अशी पडीक जमिनीच्या शोधात असतात. आणि त्या जागेचा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने बनावट दस्तऐवज बनवून जागा हडप करण्याचा प्रयत्न करीत असतात.यादव नगर परिसरातील श्रीमती नगेसरी चौहान यांच्या जागेवर कब्जा करीत त्या जागेवर अनधिकृत बांधकाम सुरू करत बजरंग दलाचे चंदन सिंग यांना पुढे करीत, जागा मालकाला धमकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून आले आहे.
श्रीमती नगेसरी चौहान हे गेल्या १९९७ पासून या जागेची घरपट्टी भरत असून या जागेच्या उताऱ्यात त्यांचे नाव कट करीत जागा  ळकावण्याचा या भू माफिया यांच्या प्रयत्न सुरू असून यामध्ये महसूल विभाग देखील त्यांच्या सोबत असल्याचे दिसुन येत आहे.
या गरिबाला न्याय देण्यासाठी आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक शिंगाडा आणि भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष अशोक सोनवणे हे प्रयत्न करीत आहेत.

    Post Views:  215


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व