दिनांक 10 मे मध्यरात्री १२ ते २ शिवपुराण कथास्थळातील ऑन द स्पॉट रिपोर्ट


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  11 May 2023, 8:13 PM
   

अकोला शहराला लागूनच असलेल्या म्हैसपूर येथे पातुर रोडला लागून दिनांक 5 मे  ते 11 मे 2023 पर्यंत पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. या कथेला दिनांक १० मे ला मध्यरात्री १२ ते २ च्या दरम्यान निर्भय बनो जनआंदोलनाच्या टीमने  भेट दिल्यानंतर तेथील अनेक विदारक चित्रे डोळ्यासमोर पाहायला मिळाले. संपूर्ण परिसराचा दौरा केला असता. कुठेही सुरक्षारक्षक, सेवाधारी सेवा देताना पाहायला मिळाले नाही. सर्व भक्तांची जबाबदारी भोलेनाथ शंकरावर टाकून आयोजक मात्र मस्त एसीमध्ये जाऊन गार झोपले.एवढे मोठे गर्दी परंतु त्यांचा झोपण्याचं नियोजन आयोजकांनी कोणतेही प्रकारचे केलेले दिसले नाही. ज्याला जिथ वाटेल तिथे झोपा. आपापल्या स्वतःच्या जबाबदारीवर महिला, पुरुष, लहान बालके जिथे जागा मिळेल तिथे झोपलेले होते. स्त्री व पुरुषची दोन पेंडॉलमध्ये वेगवेगळी स्वतंत्र व्यवस्था करायला पाहिजे होती. परंतु तसे कोणतेच नियोजन तिथे दिसले नाही
 स्त्री-पुरुष एकत्र झोपलेले  आढळले. संपूर्ण मंडपाची पाहणी केली असता भक्तांसाठी उपलब्ध केलेले एकही कुलर चालू नोहता .उलट ते कुलर जमा करून ठेवलेले आढळले. मात्र बाबासाठी चार येशी ची व्यवस्था केलेली आढळली. कुलर दिखाव्यासाठी ठेवलेले होते .त्यामध्ये पाणी नव्हते आणि ते कूलर सुद्धा चालू नव्हते. अनेक भोलेनाथ भक्तांनी चहापाणी, जेवण मात्र रात्रभर चालू ठेवलेले दिसले. अनेक भक्तांच्या वतीने तिथे चहा पाणी नाश्ता जेवणाची व्यवस्था मोफत केलेली  आढळली. कथा परिसरातील लाईन अनेक वेळा ये जा करताना आढळली. स्वच्छतेचा अभाव ,जिकडे तिकडे कचरा कचरा  पसरलेला दिसला .शिळे अन्न जागोजागी पडलेल आढळल. जागोजागी कचऱ्याचे ढीग पडलेले आढळले. मध्यरात्री अनेक दुकाने उघडे असून आपल्या व्यवसाय करीत असलेले आढळले. अनेक व्यावसायिक दुकाने लागलेले दिसले त्यावरून हा परिसर कथेचा आहे की व्यावसायिक स्टॉल लावलेला आहे .यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तसेच या परिसराची पाहणी केली असता या परिसरात लावलेल्या होल्डिंगवर आयोजक दुबे यांच्या मुलांचे फोटो जिकडे तिकडे दिसून आले आहेत .परंतु ज्या पंडित प्रदीप मिश्रा च्या नावावर या कथेचे आयोजन करण्यात आले होते त्याचे फोटो मात्र कुठेही लावलेले दिसले नाही. सगळीकडे दुबे बंधुचाच बोलबाला होल्डिंग ,पोस्टर वर दिसला. तसेच काही व्यावसायिक होल्डिंग सुद्धा लागलेले या परिसरात दिसले. आयोजकांपेक्षा या ठिकाणी चांगली व्यवस्था देण्याकरता अनेक भाविक भोलेनाथ भक्तांनी स्वतःहून अनेक खाण्यापिण्याचे मोफत स्टॉल लावलेले आढळले आणि स्वतः तिथे सेवा देताना सुद्धा ते आढळले. काही युवकांनी स्वतः वर्गणी करून तिथे पाणी कमी पडल्यामुळे पाण्याची व्यवस्था भक्तांनी भक्तांसाठी केलेली आढळली. आयोजकांनी मात्र टँकर लावलेले आढळले. परंतु ते टँकरचे पाणी पिण्यासाठी कोणीही जात नव्हते. ते सर्व भक्त पाण्याचे कॅन आहेत त्या पाण्याकडे जात असताना  दिसले. स्वयंपाक करताना रात्रभर ग्रामीण भागातील महिला या उन्हाळ्याच्या दिवसातही स्वयंपाक करताना आढळले. अनेक मंडळी जय भोलेनाथ च्या गजरामध्ये तुडुंब होऊन गाणे म्हणत असताना नाचताना तर झालेले दिसले. काही भक्तांनी भोलेनाथाचा प्रसाद घेतलेला व पिलेला दिसला. अनेक भक्ताच्या तोंडाचा वास येत होता. आणि त्या धुंदीमध्ये नाच गाणी करत असलेले अनेक ग्रुप या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळाले. तृतीय पंथीयांचा ग्रुप सुद्धा तिथं नाचताना डोलताना दिसला .महिलांची संडास लघवीची व्यवस्था अपूर्ण असल्यामुळे अनेक महिला खाली दुकानांमध्ये जाऊन या दुकानाच्या मागच्या साईडला आडोशाला जाऊन आपल्या विधी करताना दिसल्या. जागोजागी सिल्लोर च्या  दानपेटी ,पेट्या लावलेल्या भरलेल्या आढळल्या. तसेच कथा परिसरात दानधर्म करण्यासाठी पेशल कार्यालय सुद्धा उघडलेली दिसले. या ठिकाणी अनेक तरुण युवक युवती महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसली. अनेकांच्या मुलाखती घेतल्या असता अनेक शिकलेले,  पदवीधर झालेले सुशिक्षित लोकांचा महिलांचा भरणा मोठ्या प्रमाणात दिसला. आयोजकांचे कोणतेही प्रकारचे नियोजन या ठिकाणी आढळून आले नाही. परंतु ग्रामीण भागातील बहुजन, मराठी समाजाचे युवक महिला पुरुष यांनी वेगळ्या प्रकारची तन-मन-धनाने सेवा देऊन आयोजन यशस्वी करण्याकरीता मोलाचा वाटा उचललेला दिसला. ज्या काही उनिवा त्या ठिकाणी होत्या त्या महाराष्ट्रीयन मराठी ग्रामीण माणसाने स्वखर्चाने भक्तांच्या सेवेसाठी पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला दिसला. अनेक अकोला शहरातील व्यावसायिक बंधूंनी  सुद्धा आपली सेवा देऊन भक्तांना चांगल्या प्रकारे सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आढळला. पोलीस वाले मात्र मस्त कुलर लावून त्यांच्या कार्यालयात झोपलेले  आढळले भक्तांची संपूर्ण जबाबदारी भोलेनाथवर टाकून सेवाधारी व सुरक्षा यंत्रणा गाढ झोपलेली दिसली. ज्या भक्तां जवळून बसण्यासाठी 5000 ते 25 हजारापर्यंत पैसे घेतलेले होते त्यांची व्यवस्था व्हीआयपी व पाहण्याजोगी होती. बाकी भोलेनाथ भक्तांचा कोणीही वाली तिथं दिसला नाही. जय भोलेनाथ.....!                             
गजानन हरणे
समाजसेवक तथा संयोजक ,निर्भय बनो जन आंदोलन.

    Post Views:  155


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व