अकोल्याची पोरं सुस्साट, दोन क्रिकेटपटूंची IPL मध्ये एंट्री


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  14 Feb 2022, 12:51 PM
   

अकोला : जगभरातली सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणजे आयपीएल (Indian Premier League). गेल्या दोन दिवसांपासून बंगळुरुमध्ये (Banglore) या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव (TATA IPL 2022 Mega Auction) सोहळा पार पडला. एकूण 590 खेळाडूंची या मेगा ऑक्शनसाठी निवड झाली होती. त्यातल्या 203 खेळाडूंची फ्रेंचायजींनी खरेदी केली. यंदा आयपीएलमध्ये आठ नाही, तर 10 संघ (IPL Teams) मैदानावर खेळताना दिसणार आहेत. सर्वच फ्रेंचायझींना 25 खेळाडू खरेदी करता येणार होते. त्यांच्याकडे पर्समध्ये 90 कोटी रुपये होते. या फ्रेंचायझींनी जगभरातले क्रिकेटपटू आपल्या संघाकडून खेळावे यासाठी कोट्यवधी रुपये मोजले. या आयपीएल लिलावात महाराष्ट्राचे अनेक क्रिकेटपटू दिसले. त्यातल्या काहींची फ्रेंचायझींनी खरेदी केली. तर काही खेळाडू अनसोल्ड (कोणीही खरेदी केलं नाही) राहिले. दरम्यान, या लिलावात अकोल्याच्या दोन क्रिकेटपटूंनी सर्वांचं लक्ष वेधलं.

अकोला क्रिकेट क्लबच्या दोन खेळाडूंची आयपीएल 2022 मध्ये एन्ट्री झाली आहे. अष्टपैलू खेळाडू दर्शन नळकांडे याला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईसवर गुजरात टायटन्सने आपल्या संघात घेतलं. तर आक्रमक फलंदाज अथर्व तायडे याला किंग्ज इलेव्हन पंजाबने 20 लाख रुपयांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केलं. या दोन्ही खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

    Post Views:  754


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व