अकोला : अकोला जिल्ह्यात निंबा परिसरातील शैक्षणिक, सामाजिक, ग्रामीण विकास आणि विविध क्षेत्रातील दैदिप्यमान कार्याने कर्मयोगी ठरलेल्या स्व. श्रीधराव उपाख्य मालक यांचा ९९ वा जयंतीउत्सव तसेच श्रीधर पर्वाचे उद्घाटन काल निंबा येथे संपन्न झाला. अतिथींच्या स्वागतानंतर विद्यार्थ्यांच्या मानवतेचे दुसरे नांव श्रीधरराव...श्रीधरराव या हृदयस्पर्शी लक्षवेधक समूहगीताने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला
श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, माजी आमदार श्री नरेशचंद्र ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली व शिक्षक आमदार श्री किरणराव सरनाईक, शिवाजी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात जन्मशताब्दी महोत्सव समिती सचिव श्री हेमंत काळमेघ यांनी आपल्या प्रस्ताविकातून बाप्पूंच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी बोलतांना ते म्हणाले, कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या जयंतीदिनी जन्माला आलेल्या स्व. श्रीधरराव बापूंचे कार्य हे स्व.भाऊसाहेबांच्या कार्यासारखेच प्रचंड होते. निंबा परिसराला मुलभूत विकासामध्ये अग्रेसर ठेऊन गोरगरीबांच्या केलेल्या सेवेमुळेच त्यांना आदरयुक्त प्रेमाने मालक ही पदवी बहाल करण्यात आली होती. आध्यात्म संगीताची आवड, तुकारामादी संत साहित्त्याचा अभ्यास आणि त्यानुरूप वाटचाल करणारे असे हे भेदभाववारहीत सर्वधर्मसमभावी चारित्र्यसंपन्न व्यक्तीमत्व होते.त्यामुळे स्व.भाऊसाहेबांना अपेक्षित असलेला विद्यार्थी घडविण्याचे खरे कार्य मालकांनी स्थापन केलेल्या निंब्याच्या शाळेतून सुरू आहे. अशा थोर कर्मयोग्यांचे जीवनकार्य एक आदर्श म्हणून नव्या पिढीसमोर मोठ्या प्रमाणात आले पाहिजे असे ते यावेळी म्हणाले.
प्रा. श्री मोहन खडसे आणि श्री रमेश रोठे यांच्या सुत्रसंचनाखाली झालेल्या या कार्यक्रमात स्व.बाप्पूंच्या सोबत त्याकाळात राहिलेले माजी मंत्री श्री अजहर हूसेन यांनी जुण्या स्मृतींना उजाळा दिला, आमदार रणधीर सावरकर, श्री केशवराव मेतकर, श्री लक्ष्मणराव तायडे यांनीही मनोगते व्यक्त केली, तर श्री. नरेशचंद्र ठाकरे यांनी अध्यक्षिय भाषणातून श्रीधराव देशमुख यांनी बहूजन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध तर करून दिल्याच,परंतू समस्त निंबा परिराचा कायापालट घडवून आणला. सर्वच क्षेत्रातील अफाट कार्याने त्यांच्या स्मृती अजरामर ठरल्याचे सांगून त्यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्याचप्रमाणे अनेक मान्यवरांनीही श्रीधरावजी देशमुखांच्या कार्याला उजाळा देऊन त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.
वर्षभरातील आयोजित श्रीधरपर्वात विविध कार्यक्रमाने जन्मशताब्दी वर्ष आणि २३ फेब्रू २०२३ रोजी त्यांची १०० वी जयंती साजरी केली जाणार आहे. यावेळी व्यासपीठावर आमदार नितीन देशमुख, श्री केशवराव गावंडे, श्री शिरीष धोत्रे, मनोज महाजन, महेश गणगणे, उमेश जाधव, रामेश्वराव वाकळे, बाळगंगाधर वैराळे, रमेशराव सातारकर, श्री. सुरेशराव आढे, भास्कराव पाटील, पुरूषोत्तमजी दहे, भानुदास उंबरकर, विनायकराव लांडे, कृष्णराव श्री. देशमुख, पोलास पाटील प्रमोद देशमुख, पत्रकार संजय एम. देशमुख, गणेश देशमुख, ज्योतीताई सोनोने(सरपंच), सौ. अंजली तायडे, धम्मपाल तायडे, प्रा. गजानन भारसाकळे, उपस्थित होते. आभारप्रदर्शन प्राचार्य श्री विजय ठोकळ यांनी केले. या कार्यक्रमाला आणि बाप्पूंना अभिवादन करण्यासाठी निंबा व परिसरातील आणि बाहेगावाहून आलेले प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते, शिवाजी विद्यालयाचे आजी माजी शिक्षक, कर्मचारी, ग्रामस्थ व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
Post Views: 398
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay