जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑफलाईनही अर्ज करता येणार


 Sanjay M. Deshmukh  2021-11-24
   


पुणे : जात पडताळणी समितीच्या ऑनलाइृन अर्ज प्रणालीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) दिली आहे. शैक्षणिक प्रकरणाच्या अर्जदारांची संख्या 16 नोव्हेंबरपासून मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑनलाईन प्रणालीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विविध जिल्ह्यातून अर्जदार, लोप्रतिनिधी तसेच समिती कार्यालयाने ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकृतीबाबत बार्टीकडे विनंती केली होती. सध्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश सुरू आहेत, अर्जदारांची गैरसोय होऊ नये म्हणून ऑनलाईन व ऑफलाईज सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 
25 नोव्हेंबरपर्यंत अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने स्विकारण्यात येतील. ऑफलाईन अर्ज फक्त शैक्षणिक कारणासाठी स्विकारण्यात येतील. तसेच, अशा सूचना सर्व जातपडताळणी समित्यांनाही देण्यात आल्या आहे. 

    Post Views:  229


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व