काही लोकांचा माज…; शरद पवारांबद्दल नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्यावरुन मोदी-शाहांचा उल्लेख करत संजय राऊत संतापले


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  24 Jun 2022, 7:36 PM
   

महाराष्ट्रामधील केंद्रीय मंत्री शरद पवारांसारख्या व्यक्तीला धमकावत असून यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष घातलं पाहिजे असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडी विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करेल असा विश्वास व्यक्त करतानाच नारायण राणेंनी शरद पवारांना धमकीवजा इशारा देताना ट्विटरवरुन केलेल्या…तर घर गाठणे कठिण होईल वक्तव्यावरुन नाराजी व्यक्त केलीय.
पवार काय म्हणाले?
राज्यामध्ये सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असणाऱ्या शरद पवारांना धमकीवाजा इशारा दिल्याने राऊत यांनी संताप व्यक्त केलाय. बंडखोर आमदारांच्या केसालाही धक्का लागला तर घर गाठणे कठिण होईल असं वक्तव्य नारायण राणेंनी शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर केलं होतं. या वक्तव्यावर राऊत यांनी आक्षेप घेतलाय. आधी फेसबुकवरुन आणि नंतर प्रत्यक्षात पत्रकारांसमोर या मुद्द्यावरुन राऊत यांनी थेट भाजपाला सवाल केलाय.
शिवसेना मविआतून बाहेर पडायला तयार, २४ तासांत परत या, संजय राऊतांचं मोठं विधान महाविकास आघाडीचे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केला. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदी कायम असतील, हे साऱ्या देशाला दिसेल, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला होता. पवार यांनी विधानसभेत बहुमत चाचणीला उपस्थित राहून दाखवण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याला राणेंनी धमकी असं म्हणत या वयामध्ये मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही असा टोला लागवला.
राणेंनी काय म्हटलं?
महाविकास आघाडीचे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केला. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदी कायम असतील, हे साऱ्या देशाला दिसेल, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला होता. पवार यांनी विधानसभेत बहुमत चाचणीला उपस्थित राहून दाखवण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याला राणेंनी धमकी असं म्हणत या वयामध्ये मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही असा टोला लागवला.

    Post Views:  237


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व