मोदींचा कोरोनातील अपयश लपविण्याचा खोटा कांगावा


 संजय देशमुख  09 Feb 2022, 11:24 AM
   

महाराष्ट्रात आणि विशेषत:विदर्भामध्ये देशात ईतरत्र गव्हाप्रमाणेच ज्वारी हे सर्वसामान्न्यांचे मुख्य धान्न्य आहे.त्या ज्वारी पिकाची जी धांडी उभी असतात जी कणसं काढल्यानंतर वैरण म्हणून कापली जातात, त्याला कडबा म्हणतात. लपून छपून दगाफटक्याचे उद्योग करून परत स्वत:ला प्रामाणिक आणि विश्वासपात्र दर्शविणारासाठी एक म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. ईतरांना मुर्ख समजून असा शहाजोगपणा करणारांचा परिचय लोकांनी अगोदरच करून घेतलेला असतो. म्हणून आपल्या कुकर्मावर पांघरूण घालण्यासाठी खोटे नाटे बनाव करणाराला तो कडब्यात जाते पण पाण लागू देत नाही. असं म्हटल्या जाते.
असाच खोटेपणाचा बनाव रचून आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याच देशातील महाराष्ट्राला व्देषपूर्ण आणि कांगावेखोर आरोपांनी बदनाम करण्याचा प्रयत्न काल संसदेत केला.आणखीही काही मनोरंजक प्रमाद ईतिहास आणि सामान्न्य  ज्ञानाच्या अपूर्‍या माहितीमुळे त्यांचेकडून अनेकदा घडत असतात.मात्र देशातील जनता आपलेपणाच्या भावनेने ते आपलेच पंतप्रधान म्हणून हलक्या विनोदाने घेऊन विसरून जात असते. परंतू आज कोरोना निवारणात देशात अग्रेसर ठरलेल्या महाराष्ट्राच्याच अब्रूची लक्तरे फेडण्याचा प्रयत्न मोदींनी प्रत्यक्ष देशाच्या संसदेतून केलेला आहे.अशा खोट्या आरोपांनी केलेल्या हा मराठ्यांचा महाराष्ट्र कदापिही सहन करू शकणार नाही, ही गोष्टही मोदींनी लक्षात ठेवली पाहिजे. आपले अपयश लपविण्यासाठी फक्त काँग्रेस आणि महाराष्ट्राला बदनाम करणे याशिवाय मोदींकडे सांगण्यासाठी दुसरे काहीच नाही. भात्यातील बाण जेव्हा संपतात तेव्हा उसणे अवसाण आणून लढण्याशिवाय काहीही पर्याय शिल्लक नसतो, अशी परिस्थिती आज मोदींची आहे. 
लोकशाहीतील पवित्र संसदेत देशाच्या विकासाचे जनतेच्या कल्याणाचे विषय असावेत.अशा ठीकाणी राजकारण करून व्देषपूर्ण आक्रमक भाषाशैलीत एखाद्या राज्याला जाणून बूजून बदनाम करण्याचा प्रयत्न हा पंतप्रधान या  संविधानिक पदाला कमीपणा आणणारा आहे. देशाचे पंतप्रधान हे कोणत्या राज्यात कोणाचीही सत्ता असली तरी सर्वच राज्यांचे कर्तव्यवादी समान पालक असतात. त्या पालकांनीच कोणत्याही वैज्ञानिक पूराव्यांशिवाय असे धडधडीत शंभर टक्के खोटे कांगावे करणे ही देशाच्या प्रथम नागरीकाची परिपक्व विचारांची जबाबदार भुमिका नव्हे! या घसरलेल्या दर्जाची जराही खंत आणि वैषम्य खरोखरच मोदींना वाटत असेल तर त्यांनी हे निराधार आरोप मागे घेऊन आपण स्वत: लोकांचे जीव संकटात कसे टाकले हे मान्य केलं पाहिजे. परंतू पदाला साजेशी तेवढी मनाची उदारता त्यांचेकडे असती तर असे बेधडक अविचारी आरोप त्यांनी केलेच नसते. कोरोना निवारणाबद्दल महाराष्ट्र आणि उध्दव ठाकरेंचे ठिकठीकाणाहून अभिनंदन झालेले आहे, त्यांनीही नाईलाजास्तव ही वास्तवता मान्य करून मुख्यमंत्र्यांना एकदा शुभेच्छाही दिल्या होत्या. मग त्याच मोदींना महाराष्ट्रावर अशी काहीही बेछूट टीका करून प्रतिमा मलिन करण्याची विपरित प्रेरणा कशी काय झाली? ही अकस्मात प्रहार करण्याची हुक्की कशामुळे आली याचे आत्मचिंतन आणि भविष्यात अशा चुका घडू नये याच्या उपचाराचाही त्यांनी विचार केला पाहिजे. या विषयावरच आता बरेच दिवस विचारमंथन सुरू राहील. वातावरण ढवळून निघेल. मुहँसे निकला तिर कभी वापिस नही आता या न्यायाप्रमाणे या आरोपांवरील प्रत्यारोपांचे परिनाम या देशाच्या पंतप्रधानांना अनेक दिवस सहन करावे लागतील. कारण स्वत:च्या अविचारी अनेक पावित्र्यामुळे अनेक चुका आणि विनोदांनी पंतप्रधानपदाच्या आदर आणि प्रतिष्ठेला कमीपणा आणणारे या देशाच्या ईतिहासातील प्रथम पंतप्रधान हे अपश्रेय आज तरी त्यांच्याच नावे जमा आहे. संसदेत पंतप्रधान मोदींना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभारादाखल बोलण्याची ती वेळ होती. परंतू त्यावेळी आपण देशाचे पंतप्रधान आहोत आणि दोन वर्षाच्या कोरोनाच्या संकटग्रस्त परिस्थितीतून आपण नेमकेच सावरत आहोत. त्यामुळे देशाची मंदावलेली अर्थव्यवस्था सावरून त्याला विकासाच्या दिशेने कसे नेता येईल, याबध्दल राज्यांना महत्वाची आवाहनं करून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे प्रयत्न कसे करता येतील हा या देशाच्या कुटूंबप्रमुखाचा विधायक,उदात्त दृष्टीकोण त्या भाषणातून अभिप्रेत होता. परंतू या जनकल्याणप्रद हितगुजांच्या संकेतांना हेतूपुरस्सर तिलांजली दिल्या गेली. देशात कोरोनानिवारणात सर्वोत्तम कामगीरी बजावणार्‍या महाराष्ट्रालाच आडव्या हातांनी घेण्याचे घाणरडे राजकारण करण्याचा  हा मोदींकडून परत एकदा झालेला प्रयत्न आहे. संसदभवन हा राजकीय आखाडा नाही याचेही भान पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीला असू नये ही संविधानिक चौकटीतील पात्रतेच्या  परिपक्व आणि समृध्द विचारांचे लक्षण निश्चितच नाही. 60 मिनीटांच्या भाषणात 50 वेळा त्यांनी काँग्रेस काँग्रेस हे कांगावे करीत स्वत:च्या पक्षाचे राजकारण करीत राहणे ही गोष्ट संसद आणि राष्ट्रपतीपदाचाही केलेला उपमर्द का ठरू नये? 
देशात कोरोनाने शिरकाव केल्यावरही आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद न करता ट्रम्प तात्यांच्या स्वागतात प्रचंड गर्दी जमा करणार्‍या मोदींनी नंतर अकस्मात लॉकडाऊन पूकारला. त्यामुळे श्रमिकांना झालेल्या यातना, त्यांच्या झालेल्या हालअपेष्टा आणि गेलेले बळी या घटनाक्रमांचे मानवी हत्त्यारे कोण होते, याला देशच नाही तर अवघे जग साक्ष आहे. या श्रमिकांचे होणारे हाल पाहून राज्याराज्यांनी त्यांना स्वगृही पाठविण्याच्या विनवण्या केल्यानंतर त्यांच्यासाठी विविध राज्यातून श्रमिक ट्रेन सोडण्याचे निर्णय केन्द्राचे होते. अशा संकटाच्या काळातही मध्यप्रदेश सरकार पाडणे, जागोजागी कायद्यांचे उल्लंघन करून मेळावे घेणे, महाराष्ट्रात आघाडी सरकारला कोरोना निवारणात सहकार्य न करता मंदिरं उघडण्यासाठी गर्दी जमवून घंटानादात मंदिरं उघडा म्हणणारी आणि लॉकडाऊनमधील आदेशांचे उल्लंघन करणारी मंडळी काँग्रेसी तर नव्हतीच. मग महाराष्ट्रात कॉगग्रेसनेच कोरोना वाढविला आणि महाराष्ट्रातूनच कोरोना ईतरत्र पसरविला म्हणणारे मोदींचे धादांत खोटे कांगावे आणि पोरकट आरोप म्हणजे स्वत:ची चुकीची वाटचाल, आणि घाणेरड्या राजकारणातील स्वत:ची पापे लपविण्यासाठी आणि आलेल्या अपयशाचे खापर ईतरांच्या डोक्यावर फोडण्याचा एक दुर्दैवी प्रयत्न आहे! बुडत्याचे पाय खोलात म्हणतात त्याप्रमाणेच  घटनात्मक पदावरील सर्वोच्च व्यक्तीची अशी सामान्न्य माणसासारखी संतुलन घसरल्यागत विपरीत परिस्थिती हा देश आणि त्या देशाच्या विकासाला लागलेला एक दुर्दैवी अपशकूनच म्हणावा लागेल.
उठसुठ काँग्रेसच्या आणीबाणीचे विखारी डोस पाजत राहून स्वत:च्या असंविधानिक वाटचालीला लपविण्याचे प्रयत्न करणार्‍या मोदींनी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे.ज्यावेळी आपण दुसर्‍याकडे बोट दाखवतो त्यावेळी चार बोटं ही आपल्याकडे असतात.इंदिराजींना आणीबाणी आणावी लागली ती सुध्दा आपणासारख्या विघ्नसंतोषी मंडळीमुळेच.परंतू ती घटनात्मक होती. ही वास्तवता लपवून आपण मात्र बेदरकारपणे आणीबाणीसदृश्य हुकूमशाही राबवून देश अडचणीत आणून ठेवलेला आहे. आपल्या अहंकारापुढे राष्ट्रहिताचीही तमा न बाळगता सुरू असलेल्या या बेपर्वाह आक्रमक वाटचालीची देशातील जनता निश्चितच दखल घेत आहे.परिवर्तन हा सृष्टीचा नियम असतो हे प्रत्येक माणसाने लक्षात ठेवले पाहिजे!

    Post Views:  345


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व