उत्कृष्ठ कोतवाल म्हणून श्री भगवान रावणकार यांना उपविभागीय अधिकारी हस्ते सन्मान !


ब्यूरो चीफ स्वप्निल देशमुख
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  04 Aug 2023, 11:55 AM
   

संग्रामपुर तहसिल कार्यालयांतर्गत  वानखेड भाग 1 तलाठी सजेचे कोतवाल म्हणून कार्यरत असलेले श्री भगवान रावनकार यांचा  उल्लेख निय काम केल्याने आज महसूल दिनाचे औचित्य साधत
 उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद काळे साहेब यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलें . रिंगणवाडी या छोट्याशा खेडयातील असलेले श्री भगवान रावणकार हे पदविधर असूनही कोतवाल म्हणून वानखेड 1तलाठी सजेमध्ये  कार्यरत आहेत . शेतकरी व तलाठी यांच्यातील दुवा समजल्या जाणाऱ्या कोतवाल पदाची भूमिका प्रामाणिक पणे पार पाडणारे श्री भगवान रावणकार हे या सेवेबरोबरच आपतकालीन सेवेत   नेहमी पूढे राहून आपल्या वरिष्ठांची मर्जी संपादन केली . शेतसारा वसूली असो अथवा शासकिय योजना व निवडणूकीचे कामकाज असो  श्री भगवान रावणकार हे नेहमीच पुढाकार घेत असत . त्यांच्या या प्रामाणिक पणाचे फळ म्हणून त्यांचा मा. उपविभागीय अधिकारी यांनी केलेला सन्मान हा त्यांच्या कामाची पोहच पावती असून  त्यांच्या या सन्मानाबद्दल वानखेड ग्रामस्थांनी अभिनंदन केले असून पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .
एकीकडे भगवान पाटील रावणकार यांचे सारखे कर्तव्यदक्ष कोतवाल वानखेड भाग 1 तलाठी कार्यालयाला लाभले आहेत. तर दूसरीकडे मात्र संग्रामपूर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी तलाठी साजावर फर्जी कोतवाल फिरतांना व महसुल  विभागाचे कामकाज पाहतांना दिसुन येतात याकडे उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत.

    Post Views:  155


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व