अनिल ओंकार हरणे राहणार जि.. प.नगर,खडकी बु. अकोला येथे सातत्याने गेल्या 20 वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य राहिलेले व सामाजिक,धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या सामाजिक योद्धा अनिल ओंकार हरणे यांचा जन्म कावसा तालुका अकोट जिल्हा अकोला या गावी झाला आहे . मुळगाव शिंगणापुर तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती असून अकोला जिल्हा हीच त्यांची कर्मभूमी राहिली आहे . पडद्याच्या मागे राहून सातत्याने समाजकार्य करणारा प्रसिद्धीपासून दूर राहिलेला खरा सामाजिक योद्धा म्हणजे अनिल हरणे होत. सामाजिक कार्यात अग्रेसर राहुल निस्वार्थपणे आपली सेवाव्रत कार्य सातत्याने चालू ठेवले आहे. कावसा येथे युवकांमध्ये जय बजरंग व्यायाम शाळेच्या माध्यमातून व्यायामाविषयी जागृतता निर्माण केली. परिसरात गाव तेथे व्यायामशाळा, लेझीम पथक निर्माण केली. वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, ग्राम स्वच्छता अभियान असे अनेक सामाजिक उपक्रम व धार्मिक कार्यात सदैव अग्रेसर राहणारा अनिल हरणे यांचा आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी वाढदिवस. त्यानिमित्ताने त्याच्या विषयी दोन शब्द लिहावे असे मनाला वाटले . त्यानुसार अडीअडचणीत सापडलेल्या व्यक्तीला मदत सहकार्य करण्यासाठी धावून येणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणजे अनिल हरणे होय. दोस्त,, मित्र, शेजारीपाजारी नातेवाईक ओळखीपाळखी च्या सर्वांना कधी कोणतेही संकट आले तर नेहमी धावून जाणारा व्यक्ती म्हणजे अनिल हरणे होय. त्यांना आपल्या परीने जी होईल ती मदत नेहमी करीत असतो. जीवनात माणसे, मित्र जोडण्याचे काम आयुष्यभर अनिल हरणे यांनी केले. कावसा येथील शाळेच्या मित्र परिवार ग्रुप अजूनही एकमेकाच्या संपर्कात ठेवण्याचे काम सातत्याने करीत असतो. मध्यप्रदेश मध्ये नागदा येथे असतानासुद्धा तिथेसुद्धा अनिल चा मोठा चाहता वर्ग मित्रपरिवार जोडून ठेवला आहे. अजून एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी असतात.एकमेकासाठी धावून जातात ती कला अनिल ला चांगल्याप्रकारे जमली आहे. त्यानंतर जि प नगर खडकी अकोला येथे आल्या नंतर सुद्धा त्यांचे सामाजिक कार्य बहरत गेले. या ठिकाणी सुद्धा त्यांनी मोठा मित्रपरिवार अजून निर्माण करून त्यांच्यासाठी सुद्धा ते नेहमी सातत्याने काम करीत असतात. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होत असतात. त्यांच्यासाठी धावून जात असतों कोणाला कोणत्याही पद्धतीची गरज भासली अनिलला आवाज देण्याची गरज नाही. कोणाची वाट न बघता स्वतःहून झोकून देऊन सातत्याने काम करणारा धडपड्या सामाजिक कार्यकर्ता म्हणून अनिल हरणे यांच्याकडे सगळेजण पाहतात. आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून जि प नगर खडकी अकोला येथे अनेक सामाजिक व धार्मिक कार्य त्यांनी मोठ्या हिमतीने झपाटलेला सारखे केलेले आहे. कोणताही स्वार्थ न ठेवता निस्वार्थपणे गेल्या पन्नास वर्षापासून सातत्याने समाजकार्यात काम करीत आहे. लग्न,मरण ,दवाखाना कोणतेही काम असो अनिल हा त्या ठिकाणी आपली मनोभावे सेवा देत असतो.सबका भला हो, माणूस जोडण्याचे काम जीवनात सातत्याने करीत राहुन त्यांच्यासाठी धडपडत काम करीत राहला. एक सामाजिक कार्यकर्ता, मित्र कसा असावा हे ज्या वेळेस वाटते त्यावेळेस अनिल हरणे यांचे नाव पुढे येते.कावसा येथील जय बजरंग व्यायाम शाळेच्या व्यापापासून सुरू झालेला हा प्रवास सातत्याने पुढे चालत आहे. पुढे मध्यप्रदेश नागदा येथील महाराष्ट्र मंडळा पर्यंत केव्हा पोचला हे कळले सुद्धा नाही.ते तिथे न थांबता हा प्रवास जि प नगर खडकी अकोला येथे अनिलच्या कार्याला नवा बहर आला खडकी परिसरात कोणाचे सुख-दुःखात सहभागी होऊन सातत्याने अनिल गेल्या कित्येक वर्षापासून आपली सामाजिक बांधिलकी जपून सातत्याने कार्यरत आहे. सामाजिक कार्य असो, धार्मिक कार्य असो अनिल हा नेहमी आघाडीवरच असतो . जि प नगर खडकी येथील हनुमान मंदिराचे कार्य असो, हनुमान जयंती उत्सव, भागवत सप्ताह असो, राष्ट्रीय कार्यक्रम, सन,उत्सव सार्वजनिक सामाजिक कार्यक्रम असो अनिल हरणे हा नेहमी कार्य करण्यासाठी पुढेच असतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जयंती उत्सव दरवर्षी स्वराज्य भवना च्या परिसरात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. त्यामध्ये सुद्धा अनिल हरणे यांचा धडपडा कार्यकर्ता नेहमी प्रत्येक कार्यात पुढेच राहुन आपली निस्वार्थपणे सेवा देत असतो. प्रसिद्धीपासून कोसो दूर राहिलेला हाडाचा सामाजिक कार्यकर्ता जि प नगर खडकी बु. अकोला वार्ड क्रमांक 1 मध्ये सातत्याने चार वेळा म्हणजे वीस वर्ष वार्डाचा ग्रामपंचायत सदस्य निवडून येऊन लोकांना आपली निस्वार्थपणे सेवा देत राहला. एक सच्चा सेवक म्हणून समाजाची सातत्याने सेवा करीत राहला. नेहमी लोकात राहुल लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्या अडीअडचणी मघे सातत्याने काम करणारा सामाजिक योद्धा म्हणून अनिल भाऊ सर्वात लोकप्रिय आहे. शांत संयमी सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा आदर करून सर्वांना मानसन्मान देऊन सातत्याने समाजकार्यात अग्रेसर राहत असतो. आपली सामाजिक बांधिलकी जपत असतो.आपला घर, परिवार,व्यवसाय,सांभाळून अनिल मिळेल तेवढा वेळ समाजसेवेसाठी सातत्याने पन्नास वर्षापासून देत आहे. परंतु अहंकाराचा कधीही लवलेश त्याने येऊ दिला नाही. कधीही प्रसिद्धीच्या मागे लागला नाही. कामामध्ये राम आहे. हे त्याने ओळखले आहे अशा हसतमुख, धडपड्या,समाज कार्यकर्ता व धार्मिक कार्यात सुद्धा अग्रेसर राहत असलेला व्यक्ती म्हटले की अनिल हरणे यांचे नाव पुढे आल्याशिवाय राहत नाही.अशा या सामाजिक योद्ध्याला त्याच्या या आजच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप मनापासून हार्दिक अभिनंदन व पुढील सामाजिक कार्यासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा.
आपला स्नेही मित्र : श्रीकृष्ण बोदडे जवाहर नगर अकोला
Post Views: 449