माळी समाज ऋणानुबंधने प्रेरणादायी इतिहास निर्माण केला


प्रा. संतोष हुशे यांचे माळी समाज बैठकीत मार्गदर्शनपर विचार
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  21 Nov 2022, 6:06 PM
   

अकोला ः स्थानिक म. गांधी मार्ग येथे सर्वशासकीय माळी समाज बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. 27 व्या सर्वशाखीय माळी समाज उपवर युवक-युवती ऋणानुबंध परिचय महासंमेलनाचे संदर्भात बैठकीत विचार विनिमय करण्यात आला. युवा नेते व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. संतोष हुशे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी माज्ी समाज ऋणानुबंधने प्रेरणादायी इतिहास निर्माण करून आदर्श मुल्ये पेरलीत. माज्ी समाज ऋणानुबंधला पर्याय नसल्याचे म्हटले. 
महामेळाव्याचे संयोजक प्रा. श्रीकृष्ण बनसोड हे उद्घाटक होते. त्यांनी 26 वर्षापासून माज्ी समाज ऋणानुबंध महामेळावा ही भारतात नं. 1 असल्याचे म्हटले. श्री. वसंतराव भडके, डी.एस. यावतकर, मधुकर आखरे, देविदास पंत पिंपळे, प्राचार्य किसनराव मेहरे, राहुल अंबाडकर, रमेश कलोरे, सुभाष घाटोळ, इंजि. पोटकटारे, अनिल पिंपळे, शैलेंद्र शेंडे, उमाकांत चिंचोळकर आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते. आभार अ‍ॅड. सागर काळे यांनी मानले. 

    Post Views:  291


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व