१२० किलोच्या मुलाची वेटलॉस स्टोरी वाचून व्हाल हैराण, चपाती आणि भात न सोडताच घटवलं तब्बल ३७ किलो वजन!
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
10 Mar 2022, 4:31 PM
तुम्ही अशा लोकांपैकी एक आहात का जे वाढलेल्या वजनामुळे चिंतीत आहेत आणि तुम्हाला किमान ३० ते ३५ किलो वजन कमी करायचे आहे? जर उत्तर होय असेल तर जयेश राजपुरोहित या तरूणाची वेट लॉस जर्नी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.
कोरोनामुळे अनेकांचा व्यवसाय बुडाला. त्यापैकी एक होता जयेश राजपुरोहित. व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे तो मानसिकदृष्ट्याही अस्वस्थ झाला. उलट त्याचे वजनही ११३ किलोवर पोहोचले होते. स्वत:च्या शारीरिक स्थितीवर तो खूप नाखूष होता. त्यानंतर त्याने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रशिक्षकाची मदत घेतली. वजन कमी करण्याच्या या प्रवासात जयेशने सर्व काही केले ज्यामुळे त्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहचता आले. यामध्ये त्याने केवळ योग्य आहारच घेतला नाही तर नियमित व्यायामही केला आणि याद्वारे त्याने अल्पावधीतच 36 किलोहून अधिक वजन कमी केले. कोणत्या प्रकारच्या आहार आणि व्यायामामुळे ही कमाल घडली ती जाणून घेऊया.
नाव - जयेश राजपुरोहित
व्यवसाय - इंजिनीयर
वय - २८ वर्षे
उंची - ५ फूट १० इंच
शहर - दिल्लीत राहतो पण जोधपूरचा आहे
वाढलेले वजन - १२० किलो
कमी केलेले वजन - ३६ ते ३७ किलो
वजन कमी करण्यासाठी लागलेला वेळ - ९ ते १० महिने
जयेश सांगतो की, २०२० च्या सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे झालेल्या लॉसमुळे त्याला त्याचे हॉटेल बंद करावे लागले. जे तो त्याच्या स्वतःच्या गावी जोधपूरमध्ये चालवत होता. त्यावेळी तो खूप निराश झाला होता आणि आता काहीच होणार नाही असे त्याला वाटले. त्यामुळे त्याचे वजनही ११३ किलोवर पोहोचले होते आणि तो स्वत:च्या शारीरिक स्थितीबद्दल खूपच नाराज व चिंतीत होता. अशा स्थितीत आपली आर्थिक स्थिती काही काळाने सुधारेल पण वजन कमी करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न केले पाहिजेत याची जाणीव त्याला झाली. म्हणूनच तो FITTR कम्युनिटीमध्ये सामील झाला आणि या समुदायातील प्रशिक्षक असलेल्या सिद्धेश वोझालाने जयेशला वजन कमी करण्यात मदत केली.
असं होतं डाएट
नाश्ता - चीज सँडविच, अंडी, बटाटा आणि कॉफी
दुपारचे जेवण - भात किंवा चपाती, सोयाचे तुकडे, डाळ आणि हिरव्या भाज्या
रात्रीचे जेवण - स्टीम्ड राइस, पुलाव किंवा चपाती, पनीर, हिरव्या भाज्या, दही आणि व्हे प्रथिने
व्यायामापूर्वीचे जेवण - ब्लॅक कॉफी आणि फळे
व्यायामानंतरचे जेवण - व्हे प्रोटीन
जयेश आठवड्यातून 6 दिवस ट्रेनिंग करायचा. तो एका दिवसात शरीराच्या दोन बॉडी पार्टचा व्यायाम करायचा. ज्यामध्ये चेस्ट - ट्रायसेप्स आणि एब्स, बॅक - बाइसेप्स एब्स, शोल्डर - लेग्स एब्स, तो प्रत्येक सेटमध्ये १२ ते १५ रेप्स काढत असत. याशिवाय तो इतर फिजिकल अॕक्टिव्हिटीज देखील करत असे. तो रोज १० हजार पावले वॉक करत असे किंवा सायकलिंग करत असे.
जयेशच्या मते, त्याचे वेटलॉस सीक्रेट म्हणजे हेल्दी डाएट आणि व्यायाम हेच होते. वजन कमी करण्याच्या या प्रवासात त्याला खूप काही शिकायला मिळाले. त्याला हे समजले की तो आयुष्यभर त्याच्या आवडत्या पदार्थापासून अंतर ठेवून राहू शकत नाही. अशा स्थितीत त्याने आवडेल त्या सर्वच गोष्टी खाल्ल्या पण खाण्याच्या प्रमाणावर फक्त लक्ष ठेवले. शिवाय आहारातून अधिकाधिक प्रथिने कशी मिळू शकतील यावर देखील लक्ष दिले. तो म्हणतो की ही आता त्याची जीवनशैली बनली आहे आणि आयुष्यभर अशा गोष्टी खाऊन तो स्वत:ला फिट ठेवू शकतो. याशिवाय जास्त पाणी पिणे, वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे आणि ट्रेनिंग करत राहणे हे त्याच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाचे रहस्य आहे.
वजन वाढल्यानंतरच्या समस्या
जयेश सांगतो की लठ्ठपणामुळे आजारपण आणि दुखापत होण्याचा धोका वाढला होता. तसेच त्याच्या साइजचे कपडे मिळत नव्हते. याशिवाय त्याला त्याचा आवडता शर्ट आणि त्याची आवडती मँचेस्टर युनायटेड जर्सीही घालता आली नाही. इतकंच नाही तर त्याला राईड आणि ट्रेनमध्ये वरचा बर्थ शेअर करणं कठीण झालं होतं आणि विमानाची सीटही लहान होऊ लागली होते
जीवनशैलीमध्ये बदल
जयेश सांगतो की तो आठवड्यातून ६ दिवस ट्रेनिंग करायचा. तसेच दिवसातून 6 ते 7 लिटर पाणी प्यायचा. याशिवाय, तो खाताना खूप काळजी घ्यायचा. शिवाय तो प्रयत्न करायचा की अन्न थेट न गिळता चावून चावून खात असे. दारूपासून त्याने स्वतःला पूर्ण दूर ठेवले होते. तो दिवसभर खूप अॕक्टिव्ह असायचा आणि फिरायला जायचा. इतकंच नाही तर तो वाटेल तेव्हा पार्टी करत असे आणि आवडते पदार्थ खात असे पण मर्यादित राहूनच..!
टीप – वर सांगितलेला अनुभव हा तुमच्यासाठी सुद्धा लाभदायक असेलच असे नाही. त्यामुळे वरील टिप्स जशाच्या तशा फॉलो न करता तज्ज्ञ व जाणकारांचा सल्ला घ्या आणि तुमच्या शारीरिक स्थितीनुसार योग्य डाएट आणि वर्कआउट प्लान तयार करूनच वजन कमी करण्याचा प्रवास सुरु करा.
Post Views: 303