देहाक्षरं हा कथाप्रांतातील सकस आविष्कार --- डॉ. विठ्ठल वाघ


ज्येष्ठ कथाकार सुरेश पाचकवडे यांच्या देहाक्षरं कथासंग्रहांचे प्रकाशन
 संजय देशमुख  02 Jul 2023, 5:12 PM
   

अकोला, दि ..२ जुलै २०२३ :- 
       मानवी मनातील भावभावना व विचार , काही अंशी कल्पना व्यक्तीच्या देहबोलीतून येत असते . त्याचा अधिक आशय सुस्पष्ट करणारा सकस कथांचा आविष्कार म्हणजे देहाक्षरं हा कथासंग्रह आहे , असे विचार लोककवी डॉ . विठ्ठल वाघ यांनी व्यक्त केले . ते अकोल्यातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ कथाकार सुरेश पाचकवडे यांच्या देहाक्षरं  या कथासंग्रहाच्या प्रकाशनाप्रसंगी बोलत होते .
      ज्येष्ठ कथाकार सुरेश पाचकवडे यांच्या  देहाक्षरं या कथासंग्रहांचे प्रकाशन लोककवी डॉ . विठ्ठल वाघ यांच्या
 गुलबास  या निवासस्थानी संपन्न झाले. या प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य डॉ . गजानन नारे म्हणाले की , 
 सुरेश पाचकवडे यांच्या देहाक्षरं कथासंग्रहातील कथा ह्या कथाप्रांताला।समृद्ध करणाऱ्या आहेत विदर्भ साहित्य संघ शाखा अकोल्याच्या कार्याध्यक्ष सीमा शेटे-रोठे आपल्या मनोगतात म्हणाल्या की,
पाचकवडे यांच्या कथा वाचकांच्या पसंतीला निश्चितच उतरणाऱ्या आहेत कारण मानवी जीवनाच प्रतिबिंब त्यांच्या कथांमध्ये उमटलेले आहे . 
         सुप्रसिद्ध कवी प्रशांत असनारे यांनी याप्रसंगी देहाक्षरं कथासंग्रहविषयी मत व्यक्त करताना म्हणाले की , मानवी जीवनाची स्पंदनं अधोरेखित करणाऱ्या देहाक्षरं मधील कथा आहेत .  देहाक्षरं  या कथासंग्रहाच्या अनुषंगाने विदर्भ साहित्य संघ , शाखा अकोलाचे सचिव डॉ. विनय दांदळे यांनी पाचकवडे यांच्या आतापर्यंत प्रकाशित कथासंग्रह , काव्यसंग्रह ह्या संपुर्ण साहित्यावर आधारित आपली  देहाक्षरं ही कविता सादर केली . देहाक्षरं  हा कथासंग्रह म्हणजे स्त्री मनाचा टिप कागदच  आहे  असे प्रकाशनाप्रसंगी प्रा. डॉ . सुहास उगले यांनी नमूद केले . 
         सुरेश पाचकवडे यांची यापूर्वी तीन काव्यसंग्रह आणि दोन कथासंग्रह प्रसिद्ध झालेली आहेत . देहाक्षरं  ( कथासंग्रह ) हे त्यांचे सहावे पुस्तक असून विशेष म्हणजे त्यांच्या गोंदणवेणा या कथासंग्रहांस महाराष्ट्र शासनाचा मराठी वाड्मय पुरस्कार प्राप्त झालेला आहे .
      संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन डॉ . विनय दांदळे केले तर आभार प्रदर्शन प्रा .डॉ .सुहास  उगले यांनी केले .

    Post Views:  167


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व