शरदभाऊ वानखडे यांचा भव्य दिव्य गौरव समारंभ संपन्न


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  05 Apr 2023, 6:08 PM
   

अकोला : स्थानिक जिल्हा परिषद नगर खडकी बु. अकोला येथील हायवे ला लागून असलेल्या नैवेद्यम हॉटेलमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विदर्भ संघटक तथा जिल्हा मध्यवर्ती बँके मधून 31 मार्च 2023 ला सेवानिवृत्त झाल्याबद्दल तसेच त्यांनी दिलेल्या सामाजिक योगदानाबद्दल  शरदभाऊ वानखडे यांचा शरदभाऊ वानखडे मित्रपरिवार, , जिल्हा परिषद नगर खडकी परिवार, अंधश्रद्धा निर्मूलन समिती परिवार, जिल्हा मध्यवर्ती बँक परिवार ,अकोल्याची जत्रा परिवार, प्रभात परिवार ,शेतकरी जागर मंच, निर्भय बनो जण आंदोलन , बहुजन पत्रकार संघ, जुने शहर मित्रपरिवार, आदीं विविध सामाजिक संस्था संघटनेच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिव्य गौरव ,सत्कार समारंभ पार पडला. या  सत्कार गौरव समारंभाला अकोला जिल्ह्यातील अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्था संघटनेचे ,विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच , प्राध्यापक, डॉक्टर, वकील, पत्रकार, अधिकारी ,पदाधिकारी व ग्रामीण भागातील विविध गावचे सरपंच उपसरपंच सह सोयरे  मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून शरद भाऊ वानखडे यांच्या कार्याचा गौरव केला . तसेच आपला मार्गदर्शनातून शुभेच्छा दिल्यात. तसेच त्यांचा वेगवेगळ्या सामाजिक संस्था संघटनेच्या वतीने सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल , पुष्पगुच्छ आदी भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या गौरव समारंभाला मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.  तसेच उपस्थितांनी स्नेह भोजनाचा सुद्धा आस्वाद घेतला. सरते शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

    Post Views:  202


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व