महासम्राज्ञी येसूबाई यांनी हिंदू धर्माची दैदीप्यमानअस्मिता जपली.. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ.रवींद्र भोळे


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  03 Jun 2025, 8:28 AM
   

पुणे (फुगेवाडी) : महासम्राज्ञी येसूबाई ह्या शिर्के घराण्यातील असून त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा होत्या. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या कुलवधू होत्या.मोगलांनी तीस वर्षे त्यांना बंदीवासामध्ये कोंबून ठेवले होते. तरी त्यांनी आपल्या मराठी धर्माच्या जाज्वल परंपरेला तळा जाऊ दिला नाही. व त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना हिंदू राष्ट्राचे धडे दिले व योग्य संस्कार केले.महासम्राज्ञी येसूबाई यांनी हिंदू धर्माची दैदीप्यमान परंपरा जपली असे मत ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ.रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले.महासम्राज्ञी येसूबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने देण्यात येणारा समाज रत्न पुरस्कार 2025 नुकताच उरुळी कांचन येथील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र भोळे यांना प्रदान करण्यात आला. पुष्पगुच्छ शाल ,स्मृतिचिन्ह ,सन्मानपत्र व महासम्राज्ञी येसूबाई यांच्या जीवनावरील चरित्रात्मक पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप होते. वरील कार्यक्रमात डॉ. रवींद्रभोळे यांनी आपले वरील मत व्यक्त केले.राजे शिर्के घराण्यातील शिवाजीराव शिर्के संस्थापक अध्यक्ष महासम्राज्ञी येसूबाई प्रतिष्ठान यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  महासम्राज्ञी येसूबाई प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा हा समाज रत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, अपंग सेवक, हिंदू रत्न डॉ.रवींद्र भोळे यांचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे. डॉ. रवींद्र भोळे यांनी सामाजिक, धार्मिक ,अध्यात्मिक, वैद्यकीय ,वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती, नैसर्गिक आपत्ती कार्य मराठवाडा भूकंप, एड्स  निर्मूलन, टीबी कॅन्सर ,लेप्रसी , जनजागृती , आरोग्य शिबिरे ,मोफत हृदयरोग चिकित्सा शिबिरे ,आय कॅम्प , युरिनरी कॅम्प,तसेच डॉक्टर रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राच्या वतीने धर्मदाय लाखो लोकांना वैद्यकीय सेवा दिलेली आहे. त्यांच्या जीवनावर वाळवंटातील समाजसेवी सरोवर हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. डॉ.रवींद्र भोळे यांनी 35हून अधिक वर्ष राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रम केलेले आहेत. ते उत्कृष्ट प्रवचनकार असून समाज प्रबोधन व व्यसनमुक्तीचे कार्य करीत असतात.

    Post Views:  94


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व