लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वर्धापन दिन मेळाव्यात छत्रपतींना अभिवादन आणि लताजींना श्रध्दांजलीJ
पत्रकार श्री कीशोर मुटे यांना उपचारासाठी मदत
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचा ६ वा विचारमंथन मेळावा शिवजयंतीच्या पर्वावर नुकताच हॉटेल जैन रेस्ट्रो,जठारपेठ येथे संपन्न झाला.यावेळी संघटनेला एक वर्ष झाल्याबध्दल अभिष्टचिंतन करून सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.जेष्ठ पत्रकार संघटनेचे केन्द्रीय उपाध्यक्ष श्री प्रदिपजी खाडे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सर्वप्रथम स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर स्वरसम्राज्ञी स्व.लता मंगेशकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.यावेळी शासनाच्या साहित्त्य व संस्कृती मंडळाचे सदस्य श्री पुष्पराज गावंडे,जेष्ठ समाजसेवक प्रा.डॉ.संतोष हुशे,हे संघटनेचे मार्गदर्शक पदाधिकारी व संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजय एम.देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्ताविकातून संजय देशमुख संघटनेच्या वाटचालीची माहिती दिली.प्रा.डॉ.संतोष हूशे,पुष्पराज गावंडे व प्रदिप खाडे यांनीही मनोगते व्यक्त केली.याप्रसंगी कार्यविस्तार व सभासद वाढीबाबत चर्चा झाली. संघटनेचे वर्धा येथील विदर्भ विभागीय संघटन तथा संपर्कप्रमुख श्री किशोर मुटे यांचेवरील दोन शस्त्रक्रियांमुळे ते रूग्णालयात उपचाराधिन असल्यामुळे त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव मांडला.या आरोग्याविषयक मदतीच्या सुचनेला उपस्थित पत्रकार सभासदांनी स्विकृती दर्शवून अनेकांनी आर्थिक मदती दिल्या.त्यामुळे त्यांचेसाठी त्यांच्या बि.सी.आणि मदतीसह सध्या जमा झालेला रू.६०,००० चा निधी व त्यात आणखी भर घालून त्यांना पाठविण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला.

या कार्यक्रमात भारतीय कपास निगमच्या आरबिट्रेटरपदावर नियुक्ती झाल्याबध्दल माजी ज्युडी.मॅजिस्ट्रेट अॕड.श्री नितीनजी अग्रवाल,मिडीया क्षेत्रातील अग्रगण्य यु ट्युबर व उत्कृष्ट सुत्रसंचालिका म्हणून दै. भास्कर ग्रूपचा अवार्ड मिळाल्याबध्दल सौ.जया भारती इंगोले,सनदी लेखापाल म्हणून परिक्षा उत्तिर्ण होऊन यशस्वी झाल्याबद्दल तुषार तल्हार व गिरीराज घुरका यांचा अभिनंदन पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हा सचिव सौ.किर्ती मिश्रा यांच्या सुत्रसंलनाखाली झालेल्या या कार्यक्रमात संघटनेचे केन्द्रीय सचिव सर्वश्री राजेन्द्र देशमुख,कोषाध्यक्ष किशोर मानकर,प्रा.राजाभाऊ देशमुख,विदर्भ संघटक सिध्देश्वर देशमुख,डॉ.शंकरराव सांगळे,संदिप देशमुख,अंबादास तल्हार,जिल्हा कार्याध्यक्ष नंदकिशोर चौबे,जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेळके, मंगेश चऱ्हाटे,सौ.दिपाली बाहेकर,सतिश देशमुख,दिलीप नवले,रविबापू देशमुख,विजय काटे,सुरेश भारती,मनोहर मोहोड व पत्रकार सभासद उपस्थित होते.आभारप्रदर्शन मोहन शेळके यांनी केले.
Post Views: 329