एक कदम लसीकरण की ओर.... पतंगावर कोरोना मास्क लावलेल्या मुलाचे चित्र


 संजय देशमुख  2022-01-15
   

जळगांव - गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे, या संकटामुळे सर्व स्तरावरील सामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती अत्यंत विकट झाली आहे.त्यातच ओमीक्रोम सारख्या विष्णूचे देखील संकट वाढले आहे.परिस्थिती पाहता कोरोना योद्धा म्हणून  डॉक्टर, नर्स, सामाजिक स्तरावरील कार्य करणारे असो सर्व्यांनी घातक परिस्थिती हाताळून देशाला सारवण्याचा प्रयन्त केला त्यातच कोरोना योद्धाच्या रुपात चोवीस तास जनतेचे संरक्षण साठी उभे राहणारे पोलीस बंधूनी परिस्थिती अवक्यात राहण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिले.या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र पोलीस श्री चेतन वानखेडे यांच्या संकल्पनेतून  पतंगवर कोरोना व मास्क लावणार मुलगा चित्र  रेखाटन करण्यात आले.तसेच  एक कदम लसीकरण की ओर असा संदेश गगन भरारी पतंगच्या माध्यमातून दिला.सदर पतंगावरील चित्र मूर्तिकार श्री हेमंत कुंभार यांनी काढले. तसेच चेतन वानखेडे महारु साठे ,अमोल वानखेडे,भूषण ढोले,विकी सोनवणे,उमेश कुंभार यांनी पतंग तयार करण्याचे कार्य केले.तसेच छोटाखानी कार्यक्रम प्रसंगी चंद्रकांत भोई यांनी तळोदा शहरातील जनतेने कोरोना लसीकरण  करून आपल्यावर येणार संकट टाळावे असे मनोगत व्यक्त केले.सदर उपक्रम प्रसंगी भोई समाज अध्यक्ष श्री. डी. ओ भोई  जगदीश वानखेडे, चंद्रकांत साठे,गणेश शिवदे, हिरालाल साठे, प्रमोद मोरे ,तुषार वानखेडे, पवन मोरे, गणेश जावरे, विकास वानखेडे,राजेश सोनवणे, अनिल पटेल, हेमंत वानखेडे,हितेश रामोळे,मयुर वानखेडे ,डिंपल मोरे,उपस्थित होते.

    Post Views:  216


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व