राज्यस्तरीय सर्वशाखीय माळी समाज युवक-युवती परिचय महासंमेलनाचे आयोजन
संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रा डॉ संतोष हुशे यांची निवड
अकोला : माळी समाजाच्या सेवाकार्यात कार्यरत असणाऱ्या सर्व शाखीय माळी संघाच्या वतीने आगामी 2 जानेवारी 2022 रोजी अमरावती येथे 26 व्या सर्वशाखीय माळी समाज उपवर युवक, युवती ऋणानुबंध परिचय महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात महात्मा गांधी मार्ग परिसरात सर्वशाखीय माळी संघाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ओबीसी- बहुजन नेते व जेष्ठ समाजसेवी प्रा डॉ संतोष हुशे यांची एकमताने निवड करण्यात आली.स्वागताध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा यावेळी भावपूर्ण गौरव करण्यात येऊन त्यांना शुभेच्छा बहाल करण्यात आल्यात. सर्वशाखीय माळी संघाचे सचिव प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या बैठकीत नव्या वर्षात हा परिचय महामेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे नक्की करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व महामेळाव्याचे संयोजक प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी आपले विचार व्यक्त करीत प्रा डॉ हुशे यांच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे स्वागत केले.आपल्या निवडीबद्दल प्रा डॉ हुशे यांनी यावेळी संघाचे आभार व्यक्त करीत भारतातील सर्वात मोठ्या समाजातील विवाहोच्छूकांची नोंदणी होणारा व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सन्मानपूर्वक नोंद झालेला व वर्ल्ड युनिव्हर्सिटी ने दखल घेतलेल्या तथा माळी समाजाचे प्रतिनिधित्व करणारा हा महापरिचय मेळावा असून यामध्ये सर्वाधिक खप असणारी ऋणानुबंध परिचय पुस्तिका ही असून समाजातील उपवर युवक, युवतीनी ऋणानुबंध परीचय पुस्तिकेत आपल्या नावाची नोंदणी करावी असे आवाहनही यावेळी केले या महापरिचय संमेलनात राज्यातीलच नव्हे किंबहुना मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आदी राज्यातील माळी समाज बांधव आपल्या पाल्या समवेत उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.या महापरिचय संमेलनाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या बैठकीचे संचालन व आभार प्रदर्शन रामदास खंडारे यांनी केले.यावेळी प्राचार्य सुनील लोखंडे,मनोहर आखरे,डॉ श्रीकृष्ण वानखडे,वसंतराव काळे, अभिजीत काळे, रमेश कलोरे,प्राचार्य किसनराव मेहरे, गजानन चिंचोळकर,काळपांडे गुरुजी, संजय हुशे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 226