जुन्या पेन्शन मागणीसाठी अकोला येथे ४ ऑगस्ट रोजी ब्लॅक मार्च
स्वराज्य भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निघणार ब्लॅक मार्च
अकोला-- सध्या संपूर्ण राज्यात सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांकडून जुन्या पेन्शन ची मागणी जोर धरत असुन त्या करिता वेगवेगळ्या padhtine आंदोलन होतांना राज्यात दिसत आहे. याच धर्तीवर अकोला जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तसेच जिह्यातील सर्व शासकीय/ निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनेच्या पाठिंब्याने दिनांक ४ऑगस्ट २०२४ रविवार रोजी दुपारी १ वाजता स्वराज भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य पेन्शन ब्लॅक मार्च रॅली निघणार असून या रॅली मध्ये या मध्ये एकच मिशन जुनी पेन्शन या लढ्या करिता संपूर्ण अकोला जिह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय हजारो कर्मचारी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत. असे माहिती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष अमोल गुडधे यांनी कळविले आहे.
Post Views: 97