लाखो रूपयांचे सापडलेले सोने बुलढाणा अर्बनला केले परत न्यायाधिश बंधू राजकुमार अग्रवाल यांच्या प्रामाणिकतेबध्दल संस्थेकडून सत्कार!
अकोला : काळ बदलला असं म्हटल्या जातं तरीही,विश्वास आणि प्रामाणिकतेला जीवापाड जपून आदर्श मानवी जीवनमुल्यांनी जगणाऱ्या व्यक्ती आजही समाजात कायम आहेत. याचा प्रत्यय सापडलेले लाखो रूपयांचे सोने बुलढाणा अर्बन को ऑप.क्रेडीट सोसायटीला परत केल्याच्या घटनेतून अजून एकदा आलेला आहे.रामदास पेठेतील या संस्थेच्या शाखेत लॉकरजवळ सापडलेल्या सोन्याच्या बिस्कीटांची बॅग परत करून आपल्या नैतिक वाटचालीचा परिचय देणाऱ्या अकोला शहरातील या व्यावसायिकांचे नाव श्री.राजकुमार हनुमानप्रसाद अग्रवाल आहे.ते बिर्ला कॉलीनीमध्ये राहणरे न्यायाधिश श्री.नितीनजी अग्रवाल यांचे चुलत बंधू आहेत.
छोटीशी काही गोष्ट घडली तरी लगेच प्रसारमाध्यमांकडे धाव घेणाऱ्या प्रसिध्दीप्रेमी व्यक्ती आपण पाहतो.परंतू दि.२ एप्रिलला घडलेली ही घटना आहे,आणि पत्रकार संजय देशमुख हे नितीनजी अग्रवाल यांचेकडे बसलेले असताना या गोष्टीची उलगडा झाला. स्थानिक गीता नगरमधील प्रेमनिवास बंगल्यामधील रहिवाशी श्री राजकुमार अग्रवाल यांचे बुलढाणा अर्बन को ऑप.क्रेडीट सोसायटीच्या रामदासपेठ शाखेत लॉकर आहे.२ एप्रिल रोजी ते आपले लॉकर उघडण्यासाठी गेले असता,त्यांना खाली एक बॕग पडलेली दिसली.लॉकर रूममध्ये मिळालेली बॕग ही मौल्यवान वस्तूचीच असणार हे कुणालाही माहिती असतं.त्याप्रमाणेच अग्रवालजींनाही तो अंदाज आला.परंतू ती स्वतःउघडून न पाहता ती त्यांनी शाखा व्यवस्थापक श्री. किरण ठोंबरे यांचे सुपूर्द केली.उघडल्यानंतर व्यवस्थापक आणि सहकारी कर्मचाऱ्यांना धक्का बसला, आणि अंगलट येणाऱ्या संकटातून सुटल्याबध्दल आनंदही वाटला.कारण त्या बॅगमध्ये सोन्याची दोन बिस्किटे होती. लाखो रूपये किंमतीचा हा ऐवज प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल बॅंक व्यवस्थापकांना ही अग्रवालजींचा अभिमान वाटला.त्यांनी शहानिशा करून ज्यांचा ऐवज त्यांच्या ताब्यात दिला, व राजकुमार अग्रवाल यांचा सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आनंदपूर्वक सत्कारातून त्यांच्या प्रामाणितेबध्झल बद्दल त्यांना सन्मानित केले.यावेळी त्यांनी त्यांचे न्यायाधिश बंधू नितीन अग्रवाल सि.ए.असलेला मुलगा व आपल्या उच्चशिक्षित सुसंस्कारित कुटूंबाचा परिचय बॅंक व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना दिला.या दुर्मिळ आदर्शाबध्दल लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनीही त्यांचे अभिनंदन करून येत्या दि.२८ एप्रिलच्या विचारमंथन कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यासाठी निमंत्रित केले आहे.या घटनेबद्दल अग्रवालजींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Post Views: 1178