राज्यात तूर्तास लॉकडाऊन नाही! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्त्वाची माहिती
Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेनंतर कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसात राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात काही निर्बंध (Maharashtra Restrictions) लागू केले आहेत. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत अल्याने राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न सामान्य नागरिकांसह व्यापारी वर्गाला देखील पडला आहे. यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात तूर्तास लॉकडाऊन नाही. त्यामुळे लॉकडाऊनची भीती कुणीही घालू नये असं आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.
दरम्यान, कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन (Omicron) प्रकारानेही महाराष्ट्राची चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉन आणि डेल्टासाठीचे उपचार वेगवेगळे आहेत. त्यामुळे आरोग्य विभागासमोरही हे सर्वात मोठं आव्हान असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी उपाययोजना करणं आणि कठोर निर्बंध राबवणं हे शासनासमोर सर्वात मोठं आव्हान आहे. राज्यभरात चाचण्या वाढवण्यात येत आहे. तसेच मेट्रोसिटीमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे राजेश टोपे म्हणाले.
पुढे बोलताना राजेश टोपे ( Rajesh Tope) म्हणाले राज्यात, सध्यातरी लॉकडाऊनची शक्यता नाही, मात्र संसर्ग वाढू नये यासाठी निर्बंध कडक होऊ शकतात. कोरोना रुग्णसंख्या 12 ते 15 हजारावर पोहोचण्याची भीती यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. तसेच येत्या काळात परिस्थिती पाहून आणखी वेगळे निर्णय घेण्यात येतील, असे ते म्हणाले. राज्यात तूर्तास लॉकडाऊन होणार नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केल्यानंतर नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Post Views: 227