नागपूर - अखिल भारतीय ग्राहक पंचायत नागपूर महानगर व महिला प्रबोधन मंडल नागपूर व भारतीय मानक ब्यूरो यांचे संयुक्त विद्यमाने ग्राहक जागृती कार्यक्रम संत ज्ञानेश्र्वर मंदिर अभ्यंकर नगर नागपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला श्री. गजाननजी पांडे साहेब, क्षेत्रीय संघटन मंत्री, श्री. संजयजी धर्माधिकारी संघटन मंत्री महानगर, श्री.गणेशजी शिरोळे, जिल्हा अध्यक्ष, श्रीपादजी हरदास, कोषाध्यक्ष महानगर, श्री. अरविंदजी हाडे उपाध्यक्ष, सौ. तृप्तीताई आकांत सह संघटन मंत्री, सौ. स्मिताताई देशपांडे केंद्रीय कार्यकारणी सदस्य,व अनेक महिला कार्यकर्त्या यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ तृप्तीताई आकांत यांनी केले. प्रमुख अतिथी यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमान विजयजी नितनवरे साहेब भारतीय मानक ब्यूरो कार्यालय प्रमुख नागपूर , इशा खुराणा,यांनी BIS बाबत सविस्तर माहिती उपस्थितांना मराठी भाषेत समजावून सांगितली. तसेच नवीन ग्राहक कायद्या बाबत जागृत केले. त्याच प्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत क्षेत्रीय संघटन मंत्री श्रीमान गजाननजी पांडे साहेब क्षेत्रीय संघटन मंत्री यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अगदी सोप्या भाषेत ग्राहकांची फसवणूक व आदरतिथ्य कसे होते याबाबत महत्व पूर्ण माहिती दिली. कार्यक्रमाचा शेवटला टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन हे श्री. विलास ठोसर महानगर सचिव यांनी केले आणि कार्यक्रमात सर्व उपस्थित असलेले कार्यकर्ते यांनी भोजन करून कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमात ज्यांनी ज्यांनी सहयोग केला त्या सर्वांचे अखिल भारतीय ग्राहक पंचायत नागपूर महानगर कडून आभार व्यक्त करण्यात आले.
Post Views: 203