3 डिसेंबर जागतिक दिव्यांग सप्ताह घ्या : मनोज नगरनाईक


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  09 Nov 2022, 6:10 PM
   

खामगाव... संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय स्तरावर 03 डिसेंबर ला दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो
याच दिवसाचे औचीत्य साधत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्व स्थानिक संस्थेवर विविध उपक्रम राबवित साजरा करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज खामगाव तहसीलदार श्री अतुल पाटोळे यांच्या मार्फत विराट मल्टीपर्पज फाउंडेशन च्या वतीने मनोज नगरनाईक यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे
राज्यातील सर्व ग्रामपंचायत,पंचायत समिती,नगरपंचायत, नगर पालिका, महापालिका कृषी उत्पन्न बाजार समिती आदी ठिकाणी दिव्यांग स्व निधी 5%वाटप करणे, उपयुक्त संसाधन पूरविणे, आरोग्य शिबीर, सवलतीवर कर्ज वाटप करणे आदी योजना 03डिसेंबर पासून सप्ताह स्वरूपात साजरा करण्याची मागणी करण्यात आली आहे या मागणीसह या स्थानिक संस्थेवर म्हणजे ग्रामपंचायत ते महापालिका आदी स्थानिक संस्थेवर स्वीकृत सदस्य म्हणून दिव्यांग व्यक्तीची निवड करण्यासाठी कायद्यात तरतूद  करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे
हे निवेदन देतेवेळी संस्था अध्यक्ष मनोज नगरनाईक, ज्ञानेश्वर तायडे, देविदास कल्याणकर, मधुकर पाटील , शेखर तायडे आदी हजर होते

    Post Views:  579


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व