कस्तुरी चा सेवाभाव : वारी शिक्षणाची... दुर्गम आदिवासी भागातील ३०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्त्य वाटप


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  08 Jul 2024, 8:45 AM
   

अकोला : घंटा वाजली शाळेची !
....वेळ दप्तर भरण्याची...!!
....गोष्ट नाही काळजीची..!
....वारी आली शिक्षणाची...!!
विदर्भात शाळांची चालू शैक्षणिक सत्राची घंटा १ जुलै रोजी वाजली आणि शाळांचा परिसर चिमुकल्यांनी गजबजून गेला..त्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला...शिक्षकांनी या चिमुकल्यांचे पुष्प देऊन, औक्षण करून स्वागत केले.. शासनाने सुद्धा गणवेश, पुस्तके देऊन त्यांचा उत्साह वाढवला..
अशातच अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यातील अती दुर्गम आदिवासी गावातील रहिवाशी मजुरांची अवस्था पाहवत नाही, त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची... जेथे पोटा करिता दोन घास कमवण्याची सोय नाही तेथे त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक साहित्याची काय सोय लागणार...
समाजातील दुर्बल व वंचितांच्या कल्याणासाठी झटणारी कस्तुरी नं नेमकी ही बाब हेरली आणि  वारी शिक्षणाची  हा उपक्रम राबविला...
वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान लाभलेल्या संपूर्ण राज्यात लाखोंच्या संख्येत वारकरी पंढरीची वारी करत असतांना  कस्तुरी  मात्र आदिवासी व वंचित विद्यार्थ्यांसाठी  वारी शिक्षणाची  आयोजित करून त्यातच खऱ्या सुखाची अनुभूती घेत असते..
....भरली यात्रा आनंदाची !
.....वारी आली शिक्षणाची..!!
कस्तुरी ने या उपक्रमाच्या माध्यमातून तेल्हारा तालुक्यातील करी रूपागड, धोंडा आखर, चिपी गायरान, बोरव्हा आणि नई तलाई या आदिवासी गावांना भेटी देऊन तेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या वर्ग १ ते ८च्या एकूण ३०० विदयार्थ्यांना रु. १ लाख २५ हजाराचे शैक्षणिक साहित्याचे  मोफत वाटप केले. यात स्कूल बॅग्स , पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर, कंपास, पाऊच, एक्झाम पॅड, पाणी बॉटल, पाटी लेखन, लेटर बुक,टी शर्ट व आसनपट्टी इ. चा समावेश होता. कस्तुरी च्या या सामाजिक उपक्रमामुळे गरीब आदिवासी विदयार्थ्यांचा देखील शाळा प्रवेश अतिशय उत्साहात पार पडला. याप्रसंगी शाळेतील चिमुकली मुले, त्यांचे पालक आणि शिक्षक आनंदीत झाले होते..
यांचे लाभले आर्थिक सहकार्य...
कस्तुरीची वारी शिक्षणाची या सेवाप्रकल्पासाठी  कृष्णार्पण प्रतिष्ठान च्या अध्यक्षा डॉ. सौ. छाया देशमुख, श्रीमती शिलाताई गहिलोत, रितू बैस, मृणाली देशमुख, स्व. अथर्व अनिल मुळे मल्टीपरपज फॉउंडेशन चे संस्थापक प्रा. अनिल मुळे, सौ. सिमा मुळे, मिलिंद खोटरे,सुरेंद्र वानखडे, सौ. ललिता चव्हाण, मिथिलेश चव्हाण, विनयमोहन शर्मा, अभिषेक शर्मा, प्रा. जगन्नाथ बरडे,चेतनकुमार शर्मा, मोहित शर्मा, सौ. सुधा लाटा, श्रीमती मंजू शर्मा, वसंतराव देशमुख, संजय गायकवाड, संजय ठाकरे, राजेंद्र नेरकर, प्रा. प्रभाकर पाटील,सतीश बिटोडकर,सौ. रिता घोरपडे , कीर्ती गहिलोत,ज्योती सुलताने,प्रा. रोहिणी तडस, अनिता इधोळ,मेघा कनकेकर,मीरा वानखडे, सचिन मोडक व  इतर अनेक मान्यवरांनी योगदान दिले.  उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कस्तुरी चे संस्थापक अध्यक्ष प्रा. किशोर बुटोले,सचिव संजय ठाकरे, प्रकल्प प्रमुख संजय गायकवाड, राजेश्वर पेठकर, डॉ. शांताराम बुटे, वसंतराव खोटरे, संजय बुटोले, वसंतराव देशमुख, सचीन मोडक, चेतना आनंदानी, अनघा सोनखासकर,  ,लक्ष्मणसिंह ठाकूर , पद्माकर मोरे इ. मान्यवरांनी अथक परिश्रम घेतले....

    Post Views:  222


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व