महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून टॅब वाटप


महाज्योती महाविक्रम
 संजय देशमुख  2021-12-25
   

अकोला : महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपुर यांच्या वतीने अकोला येथे टॅब वाटप कार्यक्रम आज दिनांक २३ डिसेंबर २०२१ ला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात घेण्यात आला.
    या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान, माजी आमदार तथा विदर्भ वैधानिक  विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष मा. तुकाराम बिडकर यांनी विभुषित केले.  तर मुख्य अतिथी अकोला जिल्हाधिकारी मा.श्रीमती निमा अरोरा, या होत्या. या शिवाय सहा. आयूक्त मा. श्रीमती डाॅ.अनिता राठोड, समाजकल्याण विभाग, अकोला, महाज्योतीचे संचालक, प्रा. दिवाकर गमे, समता परीषदेचे उमेश मसने, महिला अध्यक्ष माया ईरतकर अतिथी  होत्या.
 महाज्योती जर दहा वर्षापुर्वी स्थापन झाली असती, व ह्या महाज्योतीच्या अशाच योजना तेंव्हा असत्या, तर मी कदाचित आज आहे,त्यापेक्षा उच्च पदावर असती! अगदी जुनी पुस्तके,टाकलेली पुस्तके यामधुन मी अभ्यास केला. नव्या कोर्‍या पुस्तकाचा वास कधी मिळालाच नाही.आज महाज्योती हे सर्व ओबीसी विजेएनटी एसबीसी विद्यार्थ्याला देत आहे!अत्यंत कमी मनुष्यबळ असतांनाही,एवढ्या चांगल्या विद्यार्थीभिमुख योजना राबवित आहे! त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा!

    Post Views:  258


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व