न्यु तापडीया नगरात श्री गजानन महाराज प्रगट दिनाचे आयोजन
अकोला : स्थानिक न्यु तापडीया नगरमधील संत गजानन महाराज मंदिरात संत गजाननांच्या 144 व्या प्रगटदिनोत्सव दि. 17 ते 23 फेब्रुवारी 2022 दरम्यान आयोजित केलेला आहे. या निमित्ताने सात दिवसांच्या या महोत्सवात मंदिराच्या प्रांगणात श्री गजानन विजय ग्रंथाचे सामुहिक पारायण व दैनंदिन किर्तन, हरिपाठ, आरती, महिला मंडळाची भजने अशा धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन आहे. यामध्ये सौ. छायाताई तांदुळकर यांचे भजन मंडळ व अंबिकापुर आणि गोणापूर टाळकरी मंडळी सक्रिय राहणार आहे. बुधवार दि. 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वाजता शोभायात्रा, हभप श्री उमाशंकर आर्य महाराज यांचे काल्याचे किर्तन व सायंकाळी 7 वाजता महाआरतीनंतर महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे. या महोत्सवात जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थिती देऊन नामसंकिर्तन सत्संग तथा महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री उमेश श्रीवास्तव, विकास रोटकर, सुनिल देशमुख, अशोक मते व गजानन सेवा समिती पदाधिकार्यांनी केले आहे.
Connection failed: Operation not permitted