सृजन साहित्य संमेलनाचे उद्‌घाटक म्हणून अभिनेते गिरीश कुलकर्णी येणार


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  27 Oct 2022, 9:16 AM
   

मूर्तिजापूर - साहित्य, सामाजिक व सेवेच्या क्षेत्रात सतत उल्लेखनिय  कार्य करणाऱ्या,येथील सृजन साहित्य संघाचे सहावे एक दिवसीय राज्य स्तरीय साहित्य संमेलन बुलढाणा येथे १३ नोव्हेंबर -२०२२ला आयोजीत केलेले असून; या साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध मराठी अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता गिरीश कुलकर्णी हे करणार आहेत .
        महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई व सृजन साहित्य संघ,मूर्तिजापूरच्या बुलढाणा येथील शाखेने सदर साहित्य संमेलनाचे संयुक्त रित्या आयोजन केलेले आहे . सृजनचे  वर्षभर्‍यातील विविध साहित्यीक कार्यक्रम व राज्यस्तरीय साहित्य संमेल ने नेमकी व उत्कृष्टरीत्या आयोजीत केलेली असतात.
           सदर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिध्द साहित्यीक रवींद्र इंगळे-चावरेकर, तसेच स्वागताध्यक्ष समाजसेवक डॉ.आशीष खासबागे हे राहणार आहेत. उद्‌घाटन, पुरस्कार वितरण, निमंत्रीतांचे कविसंमेलन,दोन उल्लेखनिय परिसंवाद, बहारदार गझल मुशायरा व समारोप असे विविधांगी श्रवणीय कार्यक्रम राहणार आहेत. संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात असून या कार्यात सर्व साहित्यीक, शाखेचे सर्व पदाधिकारी, डॉ. आशीष खासबागे, रवींद्र साळवे तसेच केंद्रीय कार्यकारिणीचे रवींद्र जवादे, मीना जवादे,प्रमोद पंत, विनोद महल्ले व इतर सर्व पदाधिकारी सहका र्य करत आहेत. असे प्रसिद्धीप्रमुख विनोद महल्ले कळवितात .

    Post Views:  117


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व