उरुळी कांचन : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार, राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य, जिल्हा परिषद ,पंचायत समिती , प्रायमरी हेल्थ सेंटर उरुळी कांचन यांच्या वतीने येथे अनेक ठिकाणी पल्स पोलिओ मोहीम येथे राबविण्यात आली. प्रायमरी हेल्थ सेंटर चे अधिकारी डॉ. सूर्यकांत हनुमंते,डॉ.सागर नाशिककर, यांचे मार्गदर्शनाखाली पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. तसेच डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्रात येथेही पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी पाच वर्षाखालील बालकांना पोलिओचा डोस देऊन शुभारंभ केला. यावेळी सौ .सीमा चव्हाण आशा आरोग्य सेविका, प्रतीक जगताप (एम पी डब्ल्यू ),अंगणवाडी कार्यकर्त्या सौ. मीरा लिंबोणे, सौ.प्रियंका कवडे परिचारिका, प्रमोद करडे( एम पी डब्ल्यू) उपस्थित होते. अनेक वर्षापासून हा उपक्रम येथे राबविला जात आहे.
Post Views: 4