अकोला-वाशिम जिल्हा बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा जिल्हा बँकेला नाबार्डचा उत्कृष्ट जिल्हा बँक पुरस्कार
नाबार्डच्या ४४ व्या स्थापना दिवसाचे औचित्य साधुन अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अमरावती विभागातून सर्वोत्कृष्ट कामगीरी करणारी बँक म्हणून गौरविण्यात आले. हा भव्य पुरस्कार सोहळा दिनांक १९ जुलै २०२५ रोजी पुणे येथे यशदा च्या सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला भारत सरकारचे सहकार राज्यमंत्री मुरलिधर मोहोळ, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, नाबार्ड मुंबई चे उपव्यवस्थापकिय संचालक गोवर्धनसिंह रावत, नाबार्ड पुणे च्या मुख्य महाप्रबंधक श्रीमती रश्मी दराड, महाराष्ट्राचे सहकार आयुक्त दिपक तावरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या पुरस्काराने बँकेला ग्रामीण भागातील आर्थिक विकासासाठी केलेल्या उल्लेखनिय कार्याची पावती मिळाली आहे. बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी हा पुरस्कार बँकेचे सर्व सन्माननिय संचालक मंडळ, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य, अधिकारी कर्मचारी तसेच बँकेचे सन्माननिय ग्राहक, शेतकरी, हितचिंतक या सर्वांचे सहकार्यामुळे प्राप्त झाला आहे. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा सन्मान भविष्यात अधिक प्रभावी व नवोन्मेषी कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा ठरेल, असा आमचा विश्वास आहे असेही ते म्हणाले.
Post Views: 116