डॉ मनोहर घुगे वैद्यकीय सेवारत्न पुरस्कारने सन्मानित
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
2026-11-25
अकोला : वाशीम रोड बायपास येथील प्रसिद्ध कवी साहित्यिक, डॉ मनोहर घुगे यांना वैदयकीय सेवा रत्न पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.
बोलीभाषा साहित्य संस्था अकोला द्वारा पहिले राष्ट्रीय बोलीभाषा साहित्य संमेलन 22/11/2026 रोजी संत गाडगेबाबा समाधी सभागृह अमरावती आयोजित करण्यात आले. संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक श्री आबासाहेब कडू उदघटिका प्रसिद्ध साहित्यिका शोभाताई रोकडे , स्वागताध्यक्ष डॉ प्रमोद काकडे, लोकस्वतंत्रपत्रकार अध्यक्ष संजय देशमुख, यलाईकार पुष्पराज गावंडे.,सल्लागार सदाशिव शेळके, बोलीभाषा साहित्य अध्यक्ष प्रा महादेव लुल्ले यांचे हस्ते डॉ मनोहर घुगे व सौ प्रीती घुगे यांना सन्मानित करण्यात आले याबद्दल साहित्यिक हिम्मत ढाळे,जेष्ठकवी तुळशीरामजी बोबडे, नाट्यक्रमी रमेश थोरात, कथाकर सुरेश पाचकवडे, जेष्ठकवी वासुदेव खोपडे,डॉ विनय दांदळे,शिवलिंग काटेकर धीरज चावरे,गजानन छबीले अंबादास चादूरकर इत्यादीनी डॉ मनोहर घुगे यांचे अभिनंदन केले.
Post Views: 34