शिवसेना आयोजित \'घरगुती गणेशोत्सव व उत्कृष्ट देखावा\' स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवारी!


आठ आकर्षक पारितोषिके आणि प्रत्येक सहभागी स्पर्धकाला मिळणार सन्मानचिन्ह; नवनियुक्त आमदार ॲड. किरण सरन
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  14 Nov 2026, 9:47 AM
   

​अकोला : शिवसेना पक्षाच्या वतीने अकोला महानगरात आयोजित करण्यात आलेल्या 'घरगुती गणेशोत्सव, उत्कृष्ट गणेशमूर्ती व उत्कृष्ट देखावा' स्पर्धेला शहरवासीयांकडून उदंड प्रतिसाद लाभला आहे. या स्पर्धेत अकोला महानगरातून १६० हून अधिक गणेशभक्तांनी सहभाग नोंदवला असून, पश्चिम विदर्भाचे नेते आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण सोहळा रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता नवीन बस स्थानकाशेजारील शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस), अकोला येथे आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती स्पर्धेचे आयोजक तथा शिवसेना जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अनिल मालगे यांनी दिली.
​दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा आणि आमदारांचा सत्कार हा बक्षीस वितरण सोहळा शिवसेनेचे नवनियुक्त आमदार ॲड. किरणजी सरनाईक यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा विशेष प्रभारी ललितभाऊ वानखडे व जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख उषाताई विरक यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत या सोहळ्याचे औचित्य साधून नवनियुक्त आमदार ॲड. किरणजी सरनाईक यांचा नागरी व पक्षीय सत्कारही करण्यात येणार आहे.
​तज्ज्ञ परीक्षकांकडून निवड व आकर्षक बक्षिसे
स्पर्धेतील गणेशमूर्ती आणि देखाव्यांचे तटस्थ व पारदर्शक मूल्यमापन करण्यासाठी ज्येष्ठ, तज्ज्ञ व अभ्यासू निरीक्षकांची विशेष समिती नियुक्त करण्यात आली होती. या परीक्षकांच्या निर्णयानुसार विजेत्यांना आठ आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला सन्मानपूर्वक स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
​अकोला महानगरातील या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांनी, गणेशभक्तांनी तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक तथा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अनिल मालगे यांनी केले आहे.


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व