ईडीची धमकी देऊन सोमय्यांनी कोट्यवधी जमवले, अधिकाऱ्यालाही 15 कोटी; राऊतांचा खळबळजनक आरोप


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  16 Feb 2022, 1:36 PM
   

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्यावर खळबळजनक आरोप केले. ईडीच्या कारवाईची धमकी देऊन सोमय्या यांनी शेकडो कोटी रुपये जमवले असल्याचा आरोप राऊत यांनी केला. सोमय्या यांनी 15 कोटी रुपये ईडीच्या एका अधिकाऱ्याला दिली असल्याचा सनसनाटी आरोप राऊत यांनी केला. राऊत यांनी पुन्हा एकदा ईडीलादेखील आव्हान दिले आहे. 

किरीट सोमय्या यांनी ईडी कारवाईची धमकी देऊन मुंबईतील जेव्हीपीडी येथील एक भूखंड बिल्डर असलेला मित्र अमित देसाई याला मिळवून दिला. या भूखंडाची किंमत 100 कोटींहून अधिक आहे. मात्र, ईडी कारवाईची धमकी देऊन सोमय्या यांनी हा भूखंड कमी किंमतीत मिळवून दिला. किरीट सोमय्या यांनी 15 कोटी रुपये ईडीच्या अधिकाऱ्याला दिले असल्याचे राऊत यांनी सांगितले. 

राऊतांचे ईडीला आव्हान 

संजय राऊत यांनी ईडीला पुन्हा एकदा आव्हान दिले. सोमय्या यांनी 15 कोटी दिलेल्या अधिकाऱ्याबाबत ईडीने माहिती द्यावी, अन्यथा त्या अधिकाऱ्याचे नाव मी उघड करणार असल्याचे आव्हान राऊत यांनी दिले. 

सोमय्या कोण आहे? राऊतांचा सवाल 

किरीट सोमय्या हे कोण आहेत, असा सवाल राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. किरीट सोमय्या हे भाजप नेते म्हणून बोलत आहेत,  असे भाजपने जाहीर करावे असेही राऊत यांनी म्हटले. किरीट सोमय्या यांनी बंगले कुठे आहेत, ते दाखवावे असे पुन्हा आव्हान देताना राऊत यांनी माझी बेनामी संपत्तीही सोमय्या यांनी दाखवावी असे आव्हान दिले. 

    Post Views:  250


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व