सीताबाई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात \'करिअर आणि एआय\' विषयावर भव्य मार्गदर्शनपर सत्र संपन्न
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
01 Sep 2026, 8:55 AM
अकोला : येथील दि बी.जी.ई सोसायटी संचालित सीताबाई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये करिअर गायडन्स अँड कौन्सेलिंग सेल आणि MKCL एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २० ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी ११:३० वाजता विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शनपर सत्र आयोजित करण्यात आले. 'करिअरच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)' हा या सत्राचा मुख्य विषय होता.याप्रसंगी दि बी.जी.ई सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहाजी मोहता, मानद सचिव डॉ. पवनजी माहेश्वरी यांच्या प्रेरणेने तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची सर यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक श्री भास्कर धारणे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आणि की-नोट स्पीकर म्हणून एमकेसीएल (MKCL) विभागातून आलेल्या कु. श्रेया दुतोंडे होत्या. त्यांच्यासोबत एमकेसीएल विभागाच्याच धर्मे मॅडम या देखील उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा. डॉ. उमेश चापके यांनी केले याप्रसंगी त्यांनी आज एमकेसीएलचे रोप्य महोत्सवी वर्ष अर्थात आज पूर्ण पंचवीस वर्षे कार्यरत असलेल्या या संस्थेचा विशेष उल्लेख केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि निवेदन डॉ. प्रा. नाना विठ्ठलराव भडके यांनी अत्यंत समर्पक, सुंदर आणि मार्मिक शैलीत केले.
MKCL चे मुख्य मार्गदर्शक कु. श्रेया दुतोंडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना आजच्या डिजिटल युगात एआय (AI) च्या वाढत्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडताना केवळ पारंपारिक क्षेत्रांकडे न बघता, एआयशी संबंधित विविध रोजगाराच्या संधी कशा शोधाव्यात आणि त्यासाठी आवश्यक ती तांत्रिक कौशल्ये कशी विकसित करावीत, याबद्दल अत्यंत सविस्तर आणि बहुमूल्य मार्गदर्शन केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाचा विद्यार्थ्यांच्या मनात भविष्यातील वाटचालीसाठी नवीन आशा आणि दिशा निर्माण झाली.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या करिअर सेलचे समन्वयक खंडेराव सर यांनी देखील उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद इतर प्राध्यापक वृंद तसेच
या मार्गदर्शनपर सत्रासाठी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित राहुल श्रेया दुतोंडे यांच्या व्याख्यानाचा लाभ घेतला आणि त्यांना विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देखील मिळवली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये करिअर आणि एआयबद्दलची जागृती वाढण्यास निश्चितच मदत झाली आहे, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व सर्व सन्माननीय व्यक्तींचे सहकार्य लाभले. शेवटी उपस्थितांचे तसेच प्रत्येक व्यक्तीकडून लाभलेल्या सहकार्याचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.