श्रीमती पंचफुला देवी पाटील समाजकार्य महाविद्यालय खडकी येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा संपन्न.
अकोला.:- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय खडकी अकोला यांच्या संयुक्त विद्यमान आज दिनांक १७/ ९ २०२२ शनिवारला सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एक दिवशीय पसंती वर आधारित श्रेयांक पद्धतीवर व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन खडकी येथे पंचफुला देवी पाटील समाजकार्य महाविद्यालयात करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या स्थानिक उद्घाटनीय अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. संकेत काळे हे होते .तर तज्ञ मार्गदर्शक म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे भौतिक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. संदीप वाघुळे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक गजानन हरणे, प्रा. डॉ. मेहरे महाविद्यालयाचे प्राचार्य केशव गोरे , कला महाविद्यालयाचे प्राचार्य येवले मॅडम, प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. रोहित काळे, प्रा डॉ.संदीप भोवते, प्रा. डॉ. कविता कावरे मॅडम, प्रा. डॉ. गणेश बोरकर, प्रा. देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये आभाशी पद्धतीने कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, माननीय प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य विकास चंद्र रस्तोगी, डॉक्टर अनिता शस्त्रबुद्धे, अध्यक्ष अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद नवी दिल्ली, माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील माननीय मंत्री महोदय उच्चतंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, महामयीम राज्यपाल तथा कुलपती भगतसिंगजी कोशारी, यांची आभासी पद्धतीने मार्गदर्शन झाले तर दिवसभराच्या चारही सत्र मध्ये तज्ञ मार्गदर्शक डॉ. संदीप वाघुळे यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमांमध्ये कार्यशाळेला उपस्थित झालेल्या प्राचार्य प्राध्यापकांना प्रमाणपत्राचे वितरण स्थानिक उपस्थित मान्यवर प्राध्यापक डॉ.संकेत काळे, डॉ. संदीप वाघुळे, समाजसेवक गजानन हरणे, प्राचार्य केशव गोरे, प्रा. डॉ. मेहरे ,प्राचार्य येवले मॅडम आदींच्या शुभहस्ते हस्ते वितरण करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य केशव गोरे तर संचालन प्रा. डॉ. बळीराम अवचार यांनी केले .कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या कार्यशाळेला खडकी परिसरातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ????????. प्रकाशनार्थ,. माननीय संपादक साहेब ,अकोला. ????
Post Views: 212