विजय शंकरराव बाहाकर यांचा प्रवास एक महत्वाचा संदेश देतो, तो असा पद मिळविणे ही उपलब्धी असू शकते; परंतु त्या पदाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करणे हेच खरे कर्तृत्व आहे


 विश्व प्रभात  10 Nov 2026, 9:27 PM
   

समाजाची खरी श्रीमंती भौतिक संपत्तीत नसते, तर समाजासाठी निःस्वार्थपणे झटणाय्रा माणसांमध्ये असते. पदापेक्षा जथाबदारीला, प्रतिष्ठेपेक्षा सेवेला आणि प्रसिद्धीपेक्षा माणसांच्या अडचणी सोडविण्याला महत्व देणारे विजय शंकरराव बाहाकर हे असेच एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. शिक्षक, शिक्षक संघटना, सहकार, ग्राहक चळवळ, कृषी मानवाधिकार ज्येष्ठ नागरिक, पत्रकारिता अणि साहित्य अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.
विजय बाहाकर यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कौटुंबिक संस्कारांतून झाली. त्यांचे वडील स्वर्गीय शंकरराव पांडुरंग बाहाकर हे पोलिस पाटील होते. शेती, किराणा व्यवसाय, कापूस व्यापार आणि अडत, अशा विविध क्षेत्रांत त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध, विश्वासार्ह व्यवहार आणि प्रत्येक व्यक्तीशी सन्मानाने वागण्याचे संस्कार विजय बाहाकर यांच्या मनावर बालपणापासून रुजलेत.  त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीत या मूल्यांचे प्रतिबिंब दिसून येते. त्यांच्या कार्यातील सर्वाधिक उल्लेखनीय पैलू म्हणजे शिक्षक संघटनेतील प्रदीर्घ नेतृत्व, सन २००० पासून ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या विदर्भ विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. शिक्षकांच्या आर्थिक, प्रशासकीय आणि सेवाविषयक प्रश्नांना शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सल्लागार अशा जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्या. हजारो शिक्षकांशी निर्माण झालेले विश्वासाचे नाते हे त्यांच्या संघटनकौशल्याचे प्रतीक आहे.
       त्यांच्या सेवजनाची वृत्तीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे इतरांच्या अडचणी सोडविण्यासाठी कोणत्याही आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न ठेवणे. शिक्षक, पोलीस, वीज विभागातील कर्मचारी तसेच इतर गरजू व्यक्तीच्या बदल्या आणि विविध प्रश्नांसाठी त्यांनी पुढाकार घेतला. अनेकदा स्वतःच्या खर्चाने मदत केली. मदत केल्यानंतर प्रसिद्धी मिळविण्यापेक्षा संबंधित व्यक्तीचे काम करून झाले यालाच ते अधिक महत्त्व देतात.
सहकार क्षेत्रात मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्था, अकोला येथे संचालक,अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष आणि स्वस्तिक गृहनिर्माण संस्थेचे स्वीकृत संचालक म्हणून त्यांनी योगदान दिले. ग्राहक हक्काच्या संरक्षणासाठी अखिल भास्तीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत सदस्य म्हणूनही ते सक्रिय आहेत. १२ मार्च २०२६ रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या एमआरपी जनआंदोलनातील त्यांचा सहभाग ग्राहकहिताविषयीची बांधिलकी अधोरेखित करतो
       महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अकोला तालुका अध्यक्ष म्हणून ज्येष्ठांच्या प्रश्नांसाठी त्यांनी काम केले आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे महाराष्ट्र राज्याचे माजी सचिव आणि जिल्हाध्यक्ष म्हणून मानवी हक्क व सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातही योगदान दिले. सप्तर्षी बहुउद्देशीय संस्था, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ आणि रोटरी क्लब ऑफ अकोला ईस्ट यांसारख्या संस्थांमधील सहभागातून त्यांचे सामाजिक कार्य विस्तारले आहे.
      लेखन आणि पत्रकारितेचीही त्यांना विशेष आवड आहे. 'प्राथमिक शिक्षकांचा झुंजार नेता हा १६४ पानी ग्रंथ आणि स्वातंत्र्य सेनानी गोपाळराव देशमुख हा
स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन माझोड तालुका जिल्हा अकोला कडून विजय बाहाकर यांना विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना १ नोव्हेंबर 2126 ला शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन सन्मान केला. स्वामी विवेकानंद ग्रुपने अकोला रत्न जिल्ह्याचा अभिमान कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचा सन्मान या पुस्तकाच्या दहा हजार प्रति छापल्या, त्या प्रति जिल्ह्यातील शाळा व कॉलेजमध्ये व लायब्ररी मध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून पुस्तके वाटप करण्यात येणार असल्याचे घोषित केले.
विजय शंकरराव बाहाकर यांनी शिक्षक संघटन, सहकार, ग्राहक चळवळ, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, मानवाधिकार आणि साहित्यिक क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. पदापेक्षा सामाजिक बांधिलकीला महत्त्व देत त्यांनी शिक्षक व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य केले. लेखन् पत्रकारिता आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनाची भूमिका जपली आहे. नेतृत्व, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव यांचा संगम असलेला त्यांचा प्रवास नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
२२६ पानी ग्रंथ त्यांनी लिहिला आहे सांगली येथे दीड लाखांहून अधिक शिक्षकांच्या उपस्थितीत पहिल्या ग्रंथाचे प्रकाशन झाले, ही त्यांच्या लेखनप्रवासातील उल्लेखनीय घटना आहे. 'माई' हे त्यांचे पुस्तक प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहे. 'साप्ताहिक अलखा, 'सनराईज बुलेटिन' आणि SU-PER NEWS 24 मराठी' या माध्यमांतून त्यांनी उपसंपादक व सहसंपादक म्हणूनही काम केले. छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीव, अमरावतीचे विस्तार संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.
      विजय शंकरराव बाहाकर यांचा प्रवास एक महत्वाचा संदेश देतो, तो असा पद मिळविणे ही उपलब्धी असू शकते. परंतु त्या पदाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करणे हेच खरे कर्तृत्व आहे. विविध क्षेत्रांतील प्रदीर्घ कार्य, निस्वार्थ सेवानाव, लेखनातून केलेले समाजप्रचोधन आणि माणसांशी जपलेले विश्वासाचे नाते हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे. नेतृत्वाला प्रामाणिकपण्णाची आणि कार्याला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली की समाजात परिवर्तनाची बीजे रुजतात, याचे विजय बहाकर हे प्रेरणादायी उदाहरण आहेत.

    Post Views:  9


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व