अकोला : गुरुवर्य वासुदेव महाराज श्रद्धा सागर आकोट येथीन निघालेला पैदलर वारी पालखीचा प्रवास पातुर वरून मालेगाव मुक्काम पर्यंत झाला असून आज सकाळी सात वाजता पातूर अकोला रोडवरील सिन्हा महाविद्यालय पातुर येथे रात्री मुक्काम किर्तन व जेवण आटपून आज सकाळी येथून चहापान फराळ लोकमत चे माजी तालुका प्रतिनिधी शंकर राव नागरे त्यांच्या घरी घेऊन पातुर शहरातील अनेक ठिकाणी पालखीचे भव्यदिव्य स्वागत केले.हे स्वागत शिकारून पालखी मेळशी येथे डॉक्टर बाबुराव घुगे यांच्या घरी भव्यदिव्य स्वागत करून सर्व भक्तगणांना महाप्रसाद वाटप करण्यात आला तसेच दुपारी तीन वाजता वारीचे नेतृत्व करीत असलेले वासुदेवराव पाटील महल्ले यांचा प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर माऊलीची वारी मालेगाव कडे निघाली जय हरी माऊली, जय जय राम कृष्ण हरी ,पालखी पातुर या घाटांमध्येय पालखीचे स्वागत करण्यात येऊन चहापान दूध व फराळाचे वाटप पुरुषोत्तम तायडे हिंगणा निंबा बाळापुर अकोला यांनी तर पाण्याच्या बॉटल मनीभाई जसमतीया यांच्यातर्फे सर्व भक्तगणांना पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात आले त्यानंतर अनेक अभंगाचा गजर करत वारीचे अनेक गावांच्या फाटा वर स्वागत करण्यात आले. रिधोरा फाटा मालेगाव रोड येथे वाघा महाराज च्या वतीने स्वागत व चहापानाचा कार्यक्रम झाला फाट्यावर स्वागत शिकारीत त्यानंतर अनेक गावात येथे गावकऱ्यांच्या वतीने भव्यदिव्य स्वागत करण्यात आले तसेच वारीमध्ये सहभागी भक्तांनी या ठिकाणी पावली, फुगडी ,रिंगण आधी करुन गावकऱ्यांचे मन जिंकली त्यानंतर पालखी मालेगाव येथे या ठिकाणी पोचलो माहेश्वरी भवन येथे आनंद बिर्ला यांनी सर्व भक्तांची राहण्याची जेवणाची तसेच रात्री कीर्तनाची व्यवस्था केली होती अशी माहिती समाजसेवक गजानन हरणे यांनी दिली
Post Views: 225
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay