सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे एक कर्तृत्व आणि संघर्षशील नेतृत्व
भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार वितरण व जयंती समारंभात डॉ. रविंद्र भोळे यांचे प्रत
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
02 Nov 2022, 4:45 PM
* डॉ.रविन्द्र भोळे यांच्या कार्याचा शासनाकडून पद्मश्रीने गौरव झाला पाहिजे : संजय देशमुख
* लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे ७ पदाधिकारी सन्मानित
अकोला- सरदार वल्लभभाई पटेल हे देशातील एक महान क्रांतिकारी, जेष्ठ राजनिती व विधीतज्ञ, स्वातंत्र संग्रामातील संघर्षशील नेतृत्व होते.दातृत्व आणि कर्तृत्वाने ओतप्रोत भरलेले अग्रगणी सेनानी लोहपूरूष होते.त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीस डी समर्पित भावनेने राष्ट्रसेवा करून गीतेतील निष्काम कर्मयोग साधला .ते महान क्रांतिकारी, थोर राष्ट्रभक्त व अखंड भारताच्या स्वातंत्र्याचे पितामह एक दैवत होते. त्यामुळे अशा थोर महापुरूषांची जयंती साजरी करणे म्हणजे त्यांच्या श्रेष्ठ कर्तृत्व साधनेच्या पूजेचा सन्मान करण्यासारखे आहे. असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्ताने पुण्यामध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख कार्याध्यक्ष,ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब आंबेकर हे अतिथी म्हणून प्रामुख्याने उपस्थित होते.
एल सी.सी.आय चे अध्यक्ष डॉ.रविन्द्र चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात पिंपरी चिंचवडच्या भातृ मंडळाचे सचिव रविन्द्र बाऱ्हाटे,सचिव लेवा पाटीदार चे कार्याध्यक्ष डॉ.एल झेड पाटील समता मातृ मंडळ अध्यक्ष सिताराम राणे,सुभाष कट्यारमल, अध्यक्ष रवींद्र बाऱ्हाटे सचिव समता भ्रातृमंडळ पिंपरी चिंचवड, डॉ एल झेड पाटील कार्याध्यक्ष लेवा पाटीदार मंडळ सांगवी, सीताराम राणे अध्यक्ष समता भ्रातृ मंडळ पिंपरी चिंचवड, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पदाधाकारी व शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे( अकोला),विदर्भ विभागीय पदाधिकारी किशोर मुटे( वर्धा) विभाव सुभाष व कट्यारमल अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यापुढे मार्गदर्शन करताना डॉ रविंद्र भोळे यांनी भारत रत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार कार्यकत्यांना स्फूर्ती देऊन राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी निरंतर प्रेरणा देईल. सरदारांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न भारताचे पंतप्रधान पू.नरेंद्र मोदीजी आत्मनिर्भर मधून पूर्ण करीत आहेत. म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनाच हा भारत रत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार पंतप्रधान पूज्य नरेंद्र मोदी यांनाच द्यायला पाहिजे असे मत व्यक्त केले. संजय देशमुख यांनी १८ वर्षाच्या परिचयातून लक्षात आलेल्या डॉ.रविन्द्र भोळे यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनिय सामाजिक कार्याचा गौरव करून खरोखरच अशा सर्वांगीण पात्र नेतृत्वाचा शासनाने पद्मश्री देऊन गौरव करावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
लेवा पाटील मंडळ सांगवी ह्यांनी कार्यकर्त्यांना एकतेची शापध दिली. ह्या वेळी डॉ मणीभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट नीती आयोग संलग्नित संस्थेचे अध्यक्ष डॉ रविंद्र भोळे ह्यांचे हस्ते विरेंद्र झोपे नाशिक , दिव्यकांत नारखेडे ठाणे, संजय देशमुख पत्रकारिता अकोला, सीताराम राणे, प्रतीक गंगणे पत्रकारिता पुणे,पुरुषोत्तम पिंपळे, सलील पाटील, राजश्री बडगुजर,डॉ रघुनाथ पाचपांडे, सौ सुवर्णा कांचन , डॉ सुचिता कदम, गंगाधर पाटील, साहित्त्यिक क्षेत्रातून पुष्पराज गावंडे (अकोला)किशोर मुटे,अकोला,शुभम् बांगडे,व्यंगचित्रकार (चांदुर बाजार) राहुल खलसे, सामाजिक क्षेत्रातून बाळासाहेब आंबेकर( सातारा), प्रा.डॉ संतोष हूसे ( अकोला),संदिप देशमुख ( अकोला)डॉ तुषार पाचपांडे, कृष्णाजी खडसे, डॉ अनिल पाटील, विक्रांत शालीग्राम चौधरी, राजेश रविंन्द्र महाजन, सागर कट्यारमल, साधना फडनीस, संजय बऱ्हाटे, मोहिनी बऱ्हाटे ह्यांचे सह पन्नास सामाजिक कार्य कर्त्याना राष्ट्रिय, राज्य सरदार पटेल पुरस्कार प्रदान करण्यात आले . सूत्रसंचालन एल डी साळवे ह्यांनी केले. नॉर्मन नॉर्टन,प्रफुल्ल झोपे, अंकुश दळवी, नितीन पारकर उपस्थित होते. राज्यभरातून अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
Post Views: 279