संवेदना फाउंडेशनचा अनोखा माणुसकीचा दिवाळी उत्सव!


कुष्ठरोगी बांधवांसोबत स्नेहभोजन, फराळ व महिलांना साडी वाटप करून वीस वर्षांपासून जपत आहेत सामाजिक बा
 विश्व प्रभात  10 Nov 2026, 11:18 AM
   

पनवेल : दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण. मात्र समाजातील काही घटक आजही आपल्या माणसांपासून, कुटुंबापासून आणि समाजापासून दूर राहण्याचे दुःख भोगत आहेत. अशा वंचित बांधवांच्या जीवनात आनंदाचे क्षण फुलविण्यासाठी संवेदना फाउंडेशनच्या वतीने कुष्ठरोग निवारण समिती, नेरे गाव येथे कुष्ठरोगी बांधवांसोबत दिवाळी सण मोठ्या उत्साहात आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी संस्थेच्या वतीने कुष्ठरोगी बांधवांसाठी स्नेहभोजन, दिवाळी फराळाचे वाटप तसेच कुष्ठरोगी महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. गेल्या वीस वर्षांपासून संवेदना फाउंडेशन अशा वंचित आणि दुर्लक्षित घटकांसोबत विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. समाजाने आणि कुटुंबाने दूर ठेवलेल्या या बांधवांच्या आयुष्यात आनंदाचे, आपलेपणाचे आणि सन्मानाचे क्षण निर्माण व्हावेत, या उदात्त हेतूने संस्थेने हा दिवाळी सोहळा आयोजित केला होता.

केवळ मदत करणे एवढाच उद्देश न ठेवता या बांधवांना आपणही समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहोत, आपलीही माणसे आहेत आणि आपल्यावरही प्रेम करणारे हात आहेत, ही भावना निर्माण करण्याचा संवेदना फाउंडेशनचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून आला. संस्थेच्या या संवेदनशील आणि माणुसकी जपणाऱ्या उपक्रमाचे समाजातील विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
यावेळी संस्थेच्या वतीने विशेष सन्मान म्हणून ॲड. प्रमोद ठाकुर व समाजसेवक श्री.गजानन गायकवाड यांचा करण्यात आला.तसेच या सोहळ्यात युवा गायक कु.पारस गवस यांनी गीत गायन करून सर्वांनां मंत्रमुग्ध केले.त्याला उपस्थित मान्यवर यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संवेदना फाउंडेशन ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून अंध, अपंग, कुष्ठरोगी सेवा, पर्यावरण, कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण आणि साहित्य अशा विविध क्षेत्रांत सातत्याने सामाजिक कार्य करीत आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेने महाराष्ट्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. संस्थेच्या सामाजिक कार्याची दखल विविध शासकीय, सामाजिक संस्था आणि संघटनांनी पुरस्कार व सन्मानांच्या माध्यमातून घेतली आहे.

या दिवाळी स्नेहसोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून शांतीवन कुष्ठरोग निवारण समितीचे कार्याध्यक्ष अॅड. प्रमोद ठाकूर, महाराष्ट्र ग्राहक संरक्षण कक्षाचे उपाध्यक्ष माननीय श्री. राजू पाटील, अभिनेता श्री. अमोल खैरे, समाजसेवक श्री. गजानन गायकवाड, संस्थेचे मार्गदर्शक व हितचिंतक श्री. लक्ष्मणदादा कदम, विक्रीकर अधिकारी (GST)श्री. अमित लालगे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे(MPSC) अधिकारी श्री. महेंद्र माने आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. विनोद सदानंद चाळके, संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. अजय शिगवण, सल्लागार श्री. प्रसाद पांचाळ, खजिनदार सौ. जयश्री चाळके, सौ.दिप्ती गुप्ता,सदस्य श्री. दीपक गुप्ता, श्री. निखिल पुष्करणा, कुमार मनोज टाकळकर, कुमार अमित सुकदरे, तरुण गायक कु.पारस गवस, कुमार ओंकार चाळके, कुमार वेदांत गवस, कु. अजय तरळकर,कु.तन्मय चाळके, कु.वेदांशी चाळके, कु.कार्तिकी चाळके, कु. देवांश गुप्ता आदी उपस्थित होते.

तसेच कुष्ठरोग निवारण समितीचे पदाधिकारी श्री. अजय शिर्के, श्री. नंदकिशोर पुरणकर, श्री. बाळाराम रोडपालकर आणि सौ. सुप्रिया रोडपालकर यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक श्री. नीलकंठ सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संवेदना फाउंडेशनचे संस्थापक तथा अध्यक्ष श्री. विनोद सदानंद चाळके यांनी मानले.यावेळी संस्थेने विशेष नाम फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक खरा मातीचा पाईक,पर्यावरण प्रेमी अभिनेता स्व.नाना पाटेकर यांना विशेष स्वरूपात श्रद्धांजली वाहिन्यात आली.

दिवाळीच्या दिव्यांनी घर उजळते; पण माणुसकीच्या दिव्याने आयुष्य उजळते, याचा प्रत्यय संवेदना फाउंडेशनच्या या उपक्रमातून आला. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रेम, आपुलकी आणि माणुसकी पोहोचविण्याचे संस्थेचे हे कार्य असेच अविरत सुरू राहो, हीच सदिच्छा!

    Post Views:  10


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व