पत्रकारिता हा सावित्रीचा वसा म्हणून स्विकारावा : प्रा.डॉ संतोष हुशे
साप्ताहिक अकोला संग्राम चा विमोचन सोहळा थाटात
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
29 Apr 2022, 6:36 PM
अकोला : आजची पत्रकारिता ही काळारुपाने बदलत चालली असून ती राजकीय पक्षाची बटिक झालेली दिसून येते आहे. परंतू सामान्य पत्रकाराने काढलेले साप्ताहिक हे कुठल्याही पक्षाचे, नेत्यांचे, ऊद्योजकाचे नसून ते सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी असतात. अशा प्रकारे ज्वलंत प्रश्नांवर वाचा फोडणारे युवा पत्रकार संदीप देशमुख यांनी आपले साप्ताहिक अकोला संग्राम हे सावित्रीचा वसा म्हणून चालवावे, असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक श्री.संतोष हूशे यांनी या प्रसंगी केले. या वेळी माजी जिल्हा परीषद सदस्य डॉ. अशोक गाडगे, श्नीराम पालकर, बिलबिले प्रवीण वाघमारे, अँड सागर काळे संपादक संदीप देशमुख आदींची ऊपस्थिती होती.
Post Views: 248