शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करा; मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन
संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाचे प्रयत्न
नागपूर : राज्यातील शेतकरी बांधवांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत असून, अशा परिस्थितीत त्यांना आधार देणे आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असून, विविध सामाजिक संस्था, संघटना तसेच नागरिकही मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. या सर्व प्रयत्नांना अधिक व्यापक स्वरूप देत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मदत कशी पोहोचविता येईल, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
रामगिरी या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, आमदार संजय भेंडे, आ. परिणय फुके, आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते. शेतकऱ्यांना मदत करण्याच्या अनुषंगाने काल राज्यातील सर्व मंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली.
Post Views: 3