ओमिक्रॉन म्हणजे नॅचरल व्हॅक्सीन या दाव्यात तथ्य आहे का?


 संजय देशमुख  2022-01-04
   

ओमिक्रॅानमुळे होणारा संसर्ग सौम्य स्वरूपाचा दिसून येतोय. रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाणही कमी आहे. रुग्णांच्या मृत्यूची संख्याही कमी आहे. त्यामुळे तीव्र संसर्गजन्य असूनही ओमिक्रॅान व्हेरियंट कोरोना विरोधातील लढाईत नॅचरल व्हॅक्सीन असल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे. पण, ही थेअरी महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॅा शशांक जोशी खोडून काढतात. ते म्हणतात, हा अत्यंत चुकीचा समज आहे. ओमिक्रॅाममुळे मृत्यू होतायत.  मग ओमिक्रॅानला नॅचरल व्हॅक्सीन का म्हटलं जातंय? या दाव्यात तथ्य आहे का? हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ओमिक्रॅानला नॅचरल व्हॅक्सीन का म्हटलं जातंय? ओमिक्रॅानला नॅचरल व्हॅक्सीन का म्हटलं जातंय यासाठी आधी आपण समजून घेऊया लस म्हणजे काय? महाराष्ट्रात ओमिक्रॉन संसर्गाचं लोकल ट्रान्समिशन झालंय? ओमिक्रॉन जर सौम्य, तर वॉर रूम का सज्ज होत आहेत? कोणत्याही आजाराविरोधात लस तयार करण्यासाठी अत्यंत दुबळा झालेला सूक्ष्मजीव किंवा व्हायरस घेण्यात येतो. काही लशींमध्ये मेलेला व्हायरसही लस निर्मितीसाठी वापरण्यात येतो. तज्ज्ञ सांगतात,की माणसाच्या शरीरात गेल्यानंतर व्हायरस गंभीर आजार निर्माण करत नाही. पण रोगाविरोधात लढण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती तयार करतो. कोरोनाविरोधात लढण्यासाठी उपलब्ध लशींमध्ये देखील अशाच प्रकारचा व्हायरसचा वापर करण्यात आलाय. महाराष्ट्राचे संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॅा. प्रदीप आवटे ओमिक्रॅानला काही जण नॅचरल व्हॅक्सीन का म्हणतात, याबद्दलचे तीन महत्त्वाचे मुद्दे सोप्या शब्दात सांगतात-
ओमिक्रॉनमुळे गंभीर आजार होत नाहीये. मात्र याची पसरण्याची क्षमता अत्यंत तीव्र आहे.
त्यामुळे अधिक लोकांना कोरोना संसर्ग होईल, पण आजार गंभीर नसेल.
प्रत्येकाच्या शरीरात पोहोचल्यामुळे अॅन्टीबॅाडीज किंवा रोगप्रतिकारशक्ती तयार होईल
या कारणांमुळे ओमिक्रॉन हे नॅचरल व्हॅक्सिनेशन आहे असं काही तज्ज्ञांचं मत आहे, डॉ. आवटे सांगतात. महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेसाठी ओमिक्रॉन व्हेरियंट कारणीभूत आहे. ओमिक्रॉनने जवळपास जीवघेण्या डेल्टा व्हेरियंटची जागा घेतलीये.
डॅा. गौतम भन्साळी मुंबईच्या खासगी रुग्णालयांचे समन्वयक आणि बॉम्बे हॅास्पिटलचे कोव्हिड रुग्णांवर उपचार जनरल फिजिशियन आहेत. त्यांच्याकडून आम्ही ओमिक्रॉन नॅचरल व्हॅक्सीन आहे का, हे जाणून घेतलं.
ते म्हणाले, ओमिक्रॅान खरंच देवाने पाठवलेली नॅचरल व्हॅक्सीन आहे. संसर्ग झाला तरी रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण कमी आहे. रुग्णांना लक्षण नाहीत किंवा अत्यंत कमी आहेत.
तज्ज्ञ सांगतात, की सध्याच्या परिस्थितीत ओमिक्रॅानच्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची गरज आणि व्हेंटिलेटर लागत नाहीये. डॅा. गौतम भन्साळी पुढे म्हणाले, डेल्टाच्या दुसऱ्या लाटेतील संसर्गाची तीव्रता या लाटेत दिसत नाहीये. रुग्णांना औषधाची गरज भारत नाही. त्यामुळे उपलब्ध डेटाच्या आधारे आपण असं म्हणू शकतोय.

ओमिक्रॉनला नॅचरल व्हॅक्सीन म्हणणं चुकीचं?
ओमिक्रॅान व्हेरियंटची लाट महाराष्ट्रात वेगाने पसरते आहे. ओमिक्रॉन नवीन आहे. डेल्टापेक्षा सौम्य असला म्हणून याकडे दुर्लक्ष करणं अजिबात योग्य ठरणार नाही. महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी सांगतात, ओमिक्रॉनला नॅचरल व्हॅक्सीन म्हणणं चुकीचं आहे. प्रत्येक संसर्गाचा साईड इफेक्ट असतो. ओमिक्रॉनमुळे मृत्यू होत नाहीत असं नाही. कमी प्रमाणात पण मृत्यू झाले आहेत. ओमिक्रॉनबाधित रुग्णांना लाँग कोव्हिडचा त्रास होऊ शकतो. याच्या परिणामांची अजून माहिती नाहीये. ओमिक्रॉन नॅचरल व्हॅक्सीन असं म्हणायला शास्त्रीय आधार नाही, डॉ. जोशी पुढे म्हणतात.

    Post Views:  330


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व