कस्तुरीचा सुगंध मेळघाटातील \' एकझीरा\' या गावी दरवळणार.....!


 Vishwaprabhat  26 Oct 2026, 5:15 PM
   

सण हा दिवाळीचा ...
वंचितांसवे साजरा ...!
आनंद नव्हाळीचा....
माणुसकीस दुजोरा ...!!
सणांचा राजा दिवाळी! घरादाराची रंगरंगोटी! खरेदीची लगबग! नवे कपडे, मिष्ठान्न नि बरंच काही! शहराच्या झगमगाटात हरवलेले बरेच जण.पण दुर कोठेतरी गावकुसाबाहेर गडद अंधाराचे साम्राज्य! त्या काळोखाला थेट भिडणारी दृढ निश्चयी करुणामयी ,
माणुसकीची प्रकाशमयी ज्योत सातत्याने तेवत ठेवणारी... अकोल्याची कस्तुरी ही संस्था यंदा धनतेरस च्या पूर्वसंध्येला बुधवार दि. ४ नोव्हेंबर २०२६  रोजी दिवाळीचा  सण मेळघाटातील
 'एकझीरा' येथील आदिवासी बांधवांसोबत साजरा करणार आहे...एकझीरा हे  मेळघाटातील अतिदुर्गम व सर्व सुखसोयींपासून वंचित असणारं आदिवासी  गाव... येथील लोकांचं जीवनमान अत्यंत हलाखीचं....
यंदा कमी पावसामुळे  संपूर्ण राज्यावर निर्माण झालेलं आसमानी संकट आणि दुष्काळाचं सावट त्यामुळे शेतकरी व शेतमजूर सोबतच वंचित व गरीब आदिवासी हवालदील झाला असतांना त्यांच्या सुखासाठी पुढे  सरसावण ही आपली सामाजिक बांधिलकी...
या भूमिकेतून कस्तुरी ही संस्था एकझीरा येथील आदिवासी
बांधवांसोबत दिवाळीचा सण साजरा करणार आहे....
त्यानिमित्त आदिवासी मुलांना नविन कपडे, फटाके  व मिठाई, माता भगिनिंना भाऊबीज भेट म्हणून नविन साडी व संपुर्ण गावांस मिष्ठान्नाचे भोजन देवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून त्यांची दिवाळी आनंदमयी करणार ...
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कस्तुरी चे कार्यकारिणी सदस्य संजय गायकवाड ( प्रकल्प प्रमुख) यांचे नेतृत्वात एक समिती गठित करण्यात आली असून त्यात सर्वश्री यशवंत देशपांडे, संजय ठाकरे, राजेश्वर पेठकर, अनिल पालवे , घनश्याम चांडक,दीपक झाडे,देविदास निखारे, वसंतराव देशमुख ,संजय बुटोले , सौ. मीरा देशपांडे ,  चेतना आनंदानी , अनिता इधोळ,सौ . संगीता जोध , सौ . मीरा वानखडे , ज्योती सुलताने , गोवर्धन गुट्टे, कृष्णकुमार दरशिंबे व हरिदास मांडवे यांचा समावेश आहे...
शहरातील सेवाभावी संस्था , दानशूर व संवेदनशील नागरिकांनी कस्तुरीच्या ' वंचितांची दिवाळी ' या सेवाभावी उपक्रमात  सहभागी होऊन दिवाळीचा सण खऱ्या अर्थाने साजरा करावा असे आवाहन कस्तुरीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. ॲड .किशोर बुटोले यांनी केले आहे...
----------------------------
प्रा. किशोर बुटोले...
संस्थापक , कस्तुरी..
९४२२८६१९७७..


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व